
काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांची कन्या मियारा आज २० वर्षांची झाली आहे. या निमित्ताने वडील रॉबर्ट वाड्रा यांनी मिरायाला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.

रॉबर्टने मियाराचे बालपणापासून ते मोठे होण्यापर्यंतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत आणि तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे .

मियाराच्या छायाचित्रांवरून असे दिसून येते की तिला प्रवासाची खूप आवड आहे आणि ती खूपच स्टायलिश आहे.

रॉबर्ट वाड्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की 'माझी सुंदर, लाडकी मुलगी मियारा हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू 20 वर्षांची झाली आहेस. तुला पाहून मनात पहिला शब्द येतो तो निर्भय.

'तू पूर्णपणे आत्मनिर्भर , कधीही हिम्मत न हारणारी , तो अत्यंत शांत, सौम्य स्वभावाची मुलगी आहे जी कुटुंबात आजी-आजोबा, मित्र आणि सर्वांची काळजी घेते.

'मला तुझा अभिमान आहे. मी तुम्हाला प्रत्येक प्रकारे, प्रत्येका दिवशी मी तुझी मदत करण्यासाठी उभा आहे. मला वाटते की मी तुझ्याकडून खूप काही शिकू शकतो.

मला विश्वास आहे की हे वर्ष तुझ्यासाठी खूप खास आहे. अनेक नवीन संधी घेऊन येईल. मी आशा करतो की आतापर्यंतच्या वर्षातील हे तुझे सर्वात सुंदर वर्ष असेल.

तसेच या वर्षात तुझे आणि आमचे प्रेम, मैत्री आणि नाते पूर्वीपेक्षा अधिक दृढ होवो अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.