
मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, त्यामुळं सहाही मतदार संघातील तालुक्यात जाऊन आढावा बैठक घेत आहे. कारण शासकीय योजना या सर्वांपर्यंत पोहचल्या पाहिजे. सर्व तालुके सर्व नगरपालिकामध्ये मी जाणार आहे. या ठिकाणच्या समस्या सोडविता येतील आणि सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचविता येतील अशी फेसबुकला देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट केली आहे.

संपूर्ण जिल्ह्यात शेवटच्या व्यक्तीपर्यंत प्रशासन पोहचविणार आहोत, आणि पक्ष ही बळकट करणार आहोत

जलसंवर्धनात लोकांचा रस वाढतो आहे, 2018-19 मध्ये केंद्र सरकारने राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेला पहिला क्रमांक आला आणि आपले जलसिंचन वाढले असं फडणवीसांनी सांगितलं आहे.

सबक्रिटिकल पावर प्लान बंद झाले पाहिजे आणि सुपर क्रिटिकल प्लांट आले पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे.

एका आरोपीने फोन करून आमच्या आमदारांना मंत्रिपदासाठी पैसे मागितले, मात्र आमच्या आमदारांना माहीत आहे की, मंत्रीपदासाठी पक्ष कधीच पैसे घेत नाही. त्यामुळं त्यांनी पोलिसांना कळविले आणि पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली.