
अनेक ठिकाणी कुत्र्याचं मांस आवडीने खाल्लं जातं. परंतु काही ठिकाणी कुत्र्याचे मांस खाण्याला विरोध केला जातो. सामाजिक दृष्टीने कुत्र्याचे मांस खाणे हे चुकीचे मानले जाते. परंतु अजूनही काही देशांत गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक लोक अशा प्रकारचे मांस खातात.

त्यामुळे कुत्र्याचे मांस खाल्ल्याने नेमकं काय होऊ शकतं? त्याला विरोध का होतो ते जाणून घेऊ या. कुत्र्याचे मांस खाल्ले तर अनेक गंभीर आजार होऊ शकतात असे मानले जाते. रेबिज हा यात पसरणारा प्राणघातक आजार आहे.

तरीदेखील जगभरात अनेक देशांत कुत्र्याचे मांस खाल्ले जाते. आशिया आणि आफ्रिकेतील काही देशांचा यात समावेश आहे. चीनमध्ये कुत्र्याचे मांस खाण्याचे प्रमाण जास्त आहे. परंतु आता चीनमधील तरुणाई याला विरोध करत आहे.

नायजेरीया, व्हिएतनाम या देशांतही काही ठिकाणी हे मांस खाल्ले जाते. येथे पारंपरिक डिश म्हणून हे मांस आवडीने खाल्ले जाते. दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, इंडोनेशिया, आफ्रिका इथेही कुत्र्याचे मांस खाल्ले जाते. कंबोडिया, लाओस, फिलिपिन्स, स्वित्झर्लंड येथे काही प्रमाणात हे मांस खाल्ले जाते.

कुत्र्याचे मांस खाल्ल्याने रेबीज होण्याचा धोका असतो. मांस पूर्णपणे शिजवलेले असेल तर रेबीज होण्याची शक्यता नसते. परंतु अर्धवट शिजलेले मांस असेल तर हा धोका निर्माण होतो. रेबीज हा विषाणू शरीरात असलेल्या कुत्र्याचेच मांस खाण्यात आले तर हा आजार होऊ शकतो.