
हिवाळ्यात म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळात पेरू खाण्यासाठी लाभदायक मानला जातो. या काळात पेरु नैसर्गिकरित्या पिकलेला आणि ताजा असतो. व्हिटॅमिन C भरपूर असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. सर्दी-खोकला टाळायला मदत करतो

पेरू मध्ये फायबर जास्त असल्यामुळे पचन क्रिया सुधारते. पेरूत पाण्याचे प्रमाण चांगले असल्याने निर्जलीकरण टाळतो...पण पावसाळ्यात पेरू खाल्ल्यास काही जणांना पचनाच्या तक्रारी होऊ शकतात, कारण या काळात फळे लवकर खराब होतात.

पेरूमध्ये फायबर जास्त असल्याने जुलाब किंवा पोटदुखीचा त्रास वाढू शकतो. कच्चा किंवा फार थंड पेरू खाल्ल्यास घशाचा त्रास वाढू शकतो. पचनशक्ती कमकुवत असलेल्यांनी पेरू अधिक खाणं टाळायला हवं...

विशेषतः संध्याकाळी किंवा रात्री पेरू टाळावा. पोटात गॅस किंवा अॅसिडिटीचा त्रास असलेल्यांनी देखील पेरू अधिक खाणं टाळायला हवं... त्रास असलेल्या लोकांनी पेरूच्या बिया काढूनच खाव्यात; नाहीतर पोटदुखी होऊ शकते.

मधुमेह असलेल्यांनी देखील पेरू अधिक खाणं टाळायला हवं... पूर्णपणे बंद नाही, पण प्रमाणातच खावा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याची कोणती समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच फळं खावीत...