
आपण बऱ्याचदा ऐकले असेल की, गव्हाची चपाती खाण्याऐवजी भाकरी खावी. पण भाकरीपेक्षा कितीतरी पट आरोग्यासाठी नाचणीची भाकरी फायदेशीर ठरते.

नाचणीची भाकरी किंवा चपाती आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. विशेष म्हणजे झटपट तुम्ही ती तयारही करू शकता. मात्र, कायम लक्षात ठेवा की, नाचणीच्या पीठात गरम पाणी मिक्स करा.

गरम पाणी मिक्स करून उंडा तयार केल्याने नाचणीची चपाती मऊ होते. विशेष म्हणजे तुम्ही नाचणीच्या पीठात इतरही काही घटक मिक्स करून चपाती तयार करू शकता.

हेच नाही तर नाचणी आरोग्यासाठी इतकी जास्त फायदेशीर आहे की, आरोग्याच्या असंख्य समस्या दूर होण्यास मदत होते. शिवाय वजन कमी होते.

फक्त नाचणीची चपातीच नाही तर तुम्ही सूप बनवूनही पिऊ शकता. नाचणीचा उपमाही तयार करू शकता. हिवाळ्यात नाचणी खाणे अधिक फायदेशीर ठरते.