
ब्राझील नट्स: तुम्ही कधी ब्राझील नट्स बद्दल ऐकलंय का? ब्राझील नट्स मध्ये सेलेनियम नावाचा घटक असतो जो हार्मोन्सचा मेटॅबॉलिझम सांभाळतो. ब्राझील नट्सचा आहारात समावेश करा, थायरॉइडवर ब्राझील नट्स चांगला परिणाम करते.

हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने आरोग्य सुधारतं हे तर आपण लहानपणापासूनच ऐकत आलोय. हिरव्या पालेभाज्यांमध्ये खनिजे, लोह, जीवनसत्त्वे असतात हा थायरॉइडच्या आजारावर उत्तम उपाय आहे.

थायरॉइडच्या रुग्णांना जळजळ खूप होते. ही जळजळ, हा त्रास कमी करण्यासाठी चिया सीड्स हा उत्तम उपाय आहे. चिया सीड्स सकाळी नाश्त्यात खाल्ले जातात. स्मूदीमध्ये टाकून हे सीड्स खाल्ले जाऊ शकतात. उपाशी पोटी सुद्धा चिया सीड्स खाणं फायदेशीर ठरू शकतं. यामध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिडचे प्रमाण खूप चांगले असते.

असं म्हणतात की श्वासांवर नियंत्रण असावं त्याने बरेच आजार दूर होतात. प्राणायम केलं की शरीर रिलॅक्स होतं, नैराश्य आणि ताणतणाव कमी करायचा असेल तर प्राणायाम करायला हवा. याशिवाय थायरॉइडचा जर त्रास असेल तर प्राणायाम हा उत्तम उपाय आहे.

कोथिंबीरीच्या बिया स्वयंपाकघरात सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. कोथिंबिरीच्या बियांचं पाणी थायरॉइडवर चांगला उपाय आहे. यात सर्व अँटीऑक्सिडंट्स आढळतात. हे अँटीऑक्सिडंट्स थायरॉइडच्या ग्रंथींचं नुकसान होण्यापासून वाचवतात आणि त्यांचं कार्य सुधारण्यास मदत करतात.