
अनेक लोकांची सकाळ 'ग्रीन टी'ने होते. ग्री टी पिल्याने आरोग्याच्या समस्या दूर होतात. मात्र, बरेच लोक सकाळी, दुपारी किंवा फार फार सायंकाळी ग्री टी पितात.

बऱ्याचदा दिवसभर आपण डाएट फॉलो करतो आणि रात्री अनहेल्दी गोष्टी खातो. ज्यामुळे दिवसभर केलेला डाएट पाण्यात जातो. हे बऱ्याच लोकांकडून होत असते.

जर रात्री अनावश्यक खाणे टाळायचे असेल तर ग्रीन टी प्यायल्याने अनावश्यक खाणे टाळता येते. यामुळे जास्त खाण्याची क्रेविंग टाळण्यास मदत होते.

एक गरम पेय असल्याने ते मेंदूला जेवण संपल्याचा संकेत देते. यामुळे गोड पदार्थ किंवा स्नॅक्स खाण्याची इच्छा हळूहळू कमी होऊ शकते.

जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल आणि कमी खायचे असेल तर सरळ रात्री जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर ग्रीन टी प्या. ज्यामुळे तुम्हाला नक्की फायदा होण्यास मदत होते.