IND vs SL: तिलक वर्माची एक चूक भारताला महागात पडली, सेमीफायनलमध्ये हे काय करुन बसला?
Tilak Verma IND A vs SL A Semifinal: आशिया कप रायझिंग स्टार २०२६ सेमीफायनलमध्ये भारत श्रीलंका आमने सामने खेळत आहे. या सामन्यात तिलक वर्माने एक चूक केली.

tilak vermaरायझिंग स्टार आशिया कप २०२६ चा सेमीफायनल सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत ३१८ धावा केल्या. आता श्रीलंकेसमोर ३१९ धावांचे लक्ष्य आहे.
खरं तर भारतीय संघाने ३१८ पेक्षाही अधिक धावा केल्या असता पण कर्णधार तिलक वर्माच्या एका चुकीमुळे तसं झालं नाही. पाकिस्तानिवरुद्ध तिलक वर्माने जी चूक केली तीच पुन्हा श्रीलंकेविरुद्ध केली.
श्रीलंकेविरुद्ध सामन्यातही तिलक वर्मा खूपच हळू खेळला. तिलक वर्माने ६६ चेंडूत ५३ धावांची खेळी खेळली. तिलकने वेगाने धावा करणे गरजेचे होते. यामुळे भारतीय संघाने अधिक धावासंख्या उभारता आल्या असता.
संपूर्ण संघ जिथे फटकेबाजी करत असतो तिथे दुसरीकडे तिलक मात्र स्लो खेळताना दिसला. पाकिस्तानविरुद्धही त्याने शतकी खेळी खेळली होती पण स्लो धावा केल्यामुळे परिणामी भारतीय संघ सामना जिंकू शकला नाही.
या सामन्यात श्रीलंका संघाचे वर्चस्व दिसत आहे. आता लवकरच निकाल कळेल ज्यावर भारतीय चाहत्यांचा विशेष लक्ष असणार आहे.