पुढे धावांचा डोंगर, गिल नावाचा वाघ एकटा लढला; विंडिजच्या बॉलरला घाम, दुहेरी शतकानं मैदान जिंकलं

Shubman Gill double century : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल याने डबल शतक झळकावत इतिहास रचला आहे.

| Updated on: Sep 30, 2026 | 10:02 PM
1 / 5
गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध ४०६ धावांचे लक्ष्य गाठताना, भारतीय कर्णधार शुभमन गिलने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आहे.

गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध ४०६ धावांचे लक्ष्य गाठताना, भारतीय कर्णधार शुभमन गिलने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आहे.

2 / 5

वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीचा समाचार घेत गिलने अवघ्या ६२ चेंडूंत धडाकेबाज शतक पूर्ण केले. या कामगिरीसह त्याने भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील चौथे सर्वात जलद वनडे शतक नोंदवले.

3 / 5

टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल याचं हे सर्वात जलद दुहेरी शतक ठरलं आहे. त्यामुळे चाहत्यांनी एकच जल्लोष केला आहे.

4 / 5

वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीचा समाचार घेत गिलने अवघ्या ६२ चेंडूंत धडाकेबाज शतक पूर्ण केले होते. त्यानंतर त्याने पुढे ११९ चेंडूमध्ये २०० धावा ठोकल्या.

5 / 5

या कामगिरीसह त्याने भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील चौथे सर्वात जलद वनडे शतक ठरले आहे. तिरुवनंतपुरममधील पहिल्या वनडे सामन्यातील ११० धावांच्या खेळीनंतर, मालिकेतील हे त्याचे सलग दुसरे शतक आणि आता दुहेरी शतकाची खेळी पूर्ण केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us