IND vs WI : रोहित शर्मा आज पण जबरदस्त खेळला, 92 धावा केल्या पण 7 वर्षात पहिल्यांदा पहावा लागला असा दिवस

India vs West Indies 3rd ODI : रोहित शर्माच्या क्षमतेवर अनेक जण शंका उपस्थित करत होते. पण रोहितने वेस्ट इंडिज विरुद्ध चालू सीरीजमध्ये सर्वांचीच तोंडं बंद केली आहेत. त्याने सलग तिसऱ्या वनडेत जबरदस्त बॅटिंग केली.

| Updated on: Oct 03, 2026 | 5:52 PM
1 / 5
टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा दाखवून दिलय की, त्याच्यात बरच क्रिकेट अजून बाकी आहे. वर्ल्ड कप 2027 साठी सज्ज असल्याचे संकेत रोहितने दिलेत.   (Photo: PTI)

टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माने पुन्हा एकदा दाखवून दिलय की, त्याच्यात बरच क्रिकेट अजून बाकी आहे. वर्ल्ड कप 2027 साठी सज्ज असल्याचे संकेत रोहितने दिलेत. (Photo: PTI)

2 / 5

वेस्ट इंडिज विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माने दमदार शतक झळकवल होतं. तिसऱ्या सामन्यातही त्याने जबरदस्त बॅटिंग केली. पण यावेळी शतकाच्या जवळ येऊन थोडक्यात संधी निसटली. (Photo: PTI)

3 / 5

भारताने 3 रन्सवर दोन विकेट गेले होते. त्यावेळी रोहितने भारताचा डाव सावरला. तो 92 धावांची शानदार इनिंग खेळला. थोडक्यात त्याचं 36 वं वनडे शतक हुकलं. रोहित टॉप क्लास प्लेयर आहे, तसाच तो खेळला. (Photo: PTI)

4 / 5

इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रोहित शर्मा 7 व्यां दा नव्वदीत पोहोचून आऊट झाला. वनडे क्रिकेटमध्ये 7 वर्षानंतर रोहितला असा दिवस पहावा लागला. याआधी 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 95 रन्सवर रोहित आऊट झालेला. (Photo: PTI)

5 / 5

रोहित शर्मा इतकी सुंदर इनिंग खेळला की, वनडे क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून त्याने 10 हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो जगातील चौथा फलंदाज बनला आहे. (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us