Weather Update : राज्यावर दुहेरी संकट, या जिल्ह्यांमध्ये धो धो पाऊस, IMD चा अलर्ट..

Weather Update : मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात बदल होताना दिसत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. आज काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला. यासोबतच सकाळी गारठा वाढण्याची शक्यता आहे.

| Updated on: Nov 27, 2026 | 7:28 AM
1 / 5
राज्यातील हवामानात बदल होत आहे. पहाटे आणि रात्री गारठा तर दुपारी उकाडा अशी स्थिती निर्माण झाली. त्यातच दुहेरी संकट बघायला मिळत आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली आहे. जळगाव आणि नाशिकमध्ये हुडहुडी कायम आहे.

राज्यातील हवामानात बदल होत आहे. पहाटे आणि रात्री गारठा तर दुपारी उकाडा अशी स्थिती निर्माण झाली. त्यातच दुहेरी संकट बघायला मिळत आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली आहे. जळगाव आणि नाशिकमध्ये हुडहुडी कायम आहे.

2 / 5

एकीकडे थंडी तर दुपारी उकाडा जाणवत असताना आता थेट पावसाचाही इशारा देण्यात आला. सातारा, सांगली, रत्नागिरी,सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या काही भागात आज पावसाचा इशारा देण्यात आला.

3 / 5

राज्यात फार जास्त थंडी नसणार असल्याचा अंदाज आहे. थंडी कमी अधिक प्रमाणात राहिल. बाकी राज्यात आज तापमानात चढउतार राहिल आणि हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. दुपारी उन्हाचा चटका अधिक जाणवेल.

4 / 5

मराठवाड्यात रात्रीच्यावेळी गारठा जाणवेल. दिवसभर कोरडे हवामान राहिल. कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. उत्तर पश्चिम दिशेकडून हवा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे डोंगरभागात तापमान उणे आहे.

5 / 5

राज्यात दुष्काळ सरकारकडून जाहीर करण्यात आला. त्यातच मध्यंतरी चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागात पाऊल होताना दिसला. आता तापमानात सतत बदल हा होताना दिसत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us