
18 व्या शतकात भारताची लोकसंख्या सुमारे 12 कोटी होती. ती आता १४२ कोटींवर जाऊन पोहचली आहे. भारतील लोकसंख्येचा प्रवास वेगाने वाढला आहे.

1800 नंतर वीस वर्षांत म्हणजेच 1820 मध्ये भारताची लोकसंख्या सुमारे 13.40 कोटी झाली होती. त्या वेळी ही वाढ मोठी नव्हती.

19व्या शतकापर्यंत भारताची लोकसंख्या 23 कोटींच्या पुढे गेली. त्यावेळी शंभर वर्षात लोकसंख्या वाढ वेगाने झालेली दिसत होती.

पुढील शंभर वर्षात लोकसंख्या वाढीचा वेग मोठा झाला. 2001 मध्ये भारताची लोकसंख्या 100 कोटींच्या पुढे गेली.

2050 पर्यंत भारताची लोकसंख्या सुमारे 166 कोटी असेल, असा अंदाज आहे. चीनमध्ये पुरुषांचे सरासरी वय 76 तर भारतात 74 आहे. भारतात महिलांचे सरासरी वय 71 तर चीनमध्ये 82 आहे.