
युरोपियन लीगसाठी कोल्हापूरच्या दर्शन पवार आणि भारतीय वंशाच्या वर्मन यांची SV Gmunden या क्लबमध्ये निवड झाली आहे. वर्मन वीस तर दर्शन हा अठरा वर्षांचा आहे. दोन्ही खेळाडूंसाठी मोठी संधी असून भविष्यात आपलं नाव गाजवण्याची मोठी संधी आहे.

वर्मन याने नेदरलंड्समध्ये आठवीत प्रथम फुटबॉयला खेळायला सुरूवात केली होती. या क्लबमधून फुटबॉलचे धडे घेत आपल्या करियरला सुरूवात केली होती. त्यानंतरच प्रशिक्षण त्याने ASWH क्लब साऊथ रॉथरडॅम या फुटबॉल क्लबमध्ये घेतलं.

वर्मन हा मूळ भारतीय वंशाचा असून त्याची आई अपर्णा या मुंबईच्या आहेत. नोकरीसाठी त्या नेदरलँडमध्ये स्थायिक झाल्या. वर्मन वर्मन याने आपली निवड झाल्यावर टीव्ही9 मराठी सोबत बोलताना, अशी संधी मिळाल्याचा मला अभिमान वाटतो, हे माझ्यासाठी एक स्वप्न होते. मी यापुढे आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन आणि क्लबसाठी माझे सर्व काही देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं वर्मन याने सांगितलं.

वयाच्या 20 व्या वर्षी वर्मन आता ऑस्ट्रियामधील SV Gmunden या क्लबमध्ये खेळताना दिसणार आहे. युरोपियन लीगमध्ये आता काही दिवसांमध्येच तो आता मैदान गाजवताना दिसणार आहे.
