Indian Railway: ट्रेनच्या इंजिनाच्या काचेवर का असते लोखंडी जाळी? 99% लोकांना उत्तर नाही माहित
Train Engine Windshield: ट्रेनच्या इंजिनाच्या काचेवर लोखंडी जाळी का असते? त्याने काय होते? दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या अनेकांना त्याची माहिती नसते. कशासाठी वापर होतो या लोखंडी जाळीचा?

Train Engine Windshield: भारतीय रेल्वेतून रोज लाखो प्रवासी ये-जा करतात. ट्रेनच्या इंजिनाच्या काचेवर एक लोखंडी जाळी आपल्याला कायम दिसते. पण अनेक लोकांना ती का लावण्यात येते हे माहिती नसते. कशासाठी होतो उपयोग या जाळीचा? काय होतो त्याचा फायदा? जाणून घेऊयात.

रेल्वेच्या इंजिनाच्या खोबणीत दोना काचा असतात आणि त्यावर लोखंडी जाळी असते. तुम्ही रेल्वेने प्रवास केला असेल तर हे दृश्य तुम्हाला हमखास दिसते. रेल्वे स्टेशनवर येताना हे दृश्य नेहमी दिसते. इंजिनाची पुढची काच ही नेहमी लोखंडी जाळीने झाकलेली असते.

अनेक प्रवाशांना त्यात काही महत्त्वाचं वाटत नाही. अथवा काहींना हा डिझाईनाचा एक भाग असल्याचे वाटते. पण ही जाळी रेल्वे सुरक्षेमध्ये एक महत्त्वाची भूमिका निभावते. ही जाळी लोको पायलट आणि इंजिनाच्या काचेला दगड, पक्षी आणि वस्तू धडकून बसू नये यासाठी लावण्यात येते.

रेल्वे अनेकदा ताशी 100 ते 150 किमी वेगाने धावते. या जोरदार वेगाने रेल्वे रुळावरील दगड आणि इतर घटक धडाधड उडतात. पडलेले दगड अथवा बारीक खडी ही उडून काचेवर आदळू नये, लोको पायलटला दुखापत होऊ नये यासाठी विंडशील्डवर लोखंडी जाळी बसवण्यात येते.

ही धातूची जाळी एका ढालीसारखी असते. दगडाचा अथवा इतर वस्तूचा जोराचा फटका बसून काच फुटू नये. लोकोपायलटला इजा होऊ नये यासाठी ही तजवीत करण्यात येते. या जाळीवर टणकदार वस्तू आदळल्यावर अगोदर जाळीला लागते. त्यामुळे काचेवरील आघात कमी होतो.

तर काही समाजकंटक हे रेल्वेवर दगडफेक करतात. काचेच्या बाटल्या मारून फेकतात. रुळाच्या दोन्ही बाजूने हा धोका असतो. अशावेळी वेगाने धावणाऱ्या रेल्वेच्या समोरील बाजूच्या काचेचं संरक्षण व्हावे यासाठी लोखंडी जाळीची मदत होते.