AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Story : मोठा ट्विस्ट! शरद पवारांनी घरात बसून दोन जागा खेचल्या, अजित पवारांनंतरच्या पहिल्याच निवडणुकीत…

विधान परिषदेच्या निवडणुकीत शरद पवार गटाने २ जागा जिंकत अजित पवार गटाला धक्का दिला. सत्ता असूनही अजितदादांच्या गटाला पराभव स्वीकारावा लागला. शरद पवारांनी घरातूनच ही किमया साधत राजकीय चाणक्यत्व सिद्ध केले. हा निकाल अजित पवार गटासमोरील नेतृत्वाचे आव्हान स्पष्ट करतो.

Special Story : मोठा ट्विस्ट! शरद पवारांनी घरात बसून दोन जागा खेचल्या, अजित पवारांनंतरच्या पहिल्याच निवडणुकीत...
sunetra pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 28, 2026 | 3:46 PM
Share

राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीत महायुतीच्या पारड्यात 3 तर शरद पवार गटाच्या पारड्यात 2 जागा गेल्याचं चित्र आहे. तसेच महायुतीचा उमेदवार एका जागेवर ज्या ठिकाणी आघाडीवर आहे, त्या ठिकाणी दुसऱ्या पसंती क्रमाच्या मोजणीत काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीचं चित्र पालटण्याचा अंदाज आहे. या निवडणुकीत शरद पवार गटाने अजितदादा गटावर सरशी केली आहे. शरद पवार यांनी घरात बसून या दोन्ही जागा खेचून आणल्या आहेत. तर सत्ता असूनही अजितदादा गटाला जागा गमवावी लागली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतरची अजितदादा गटाची ही पहिलीच मोठी निवडणूक होती. या पहिल्याच निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागल्याने अजितदादा गटात खळबळ उडाली आहे.

शरद पवार गटाने दोन जागा लढवल्या होत्या. त्यापैकी पुणे पदवीधर मतदार संघात पवार गटाच्या हर्षदा देशमुख जाधव या 1 लाख 11 हजार 510 मते घेऊन आघाडीवर आहेत. तर छत्रपती संभाजी नगरमध्ये शरद पवार गटाचे प्रतापसिंह पाटील 73 हजार 973 मते घेऊन आघाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात अजितदादा गटाचे सतीश चव्हाण लढत आहेत. चव्हाण यांना केवळ 60818 मते मिळाली आहेत. पवार गटाच्या उमेदवाराने या निवडणुकीत अजितदादा गटाच्या उमेदवाराला धोबी पछाड केलं आहे.

घरात बसून गेम फिरवला

शरद पवार यांनी घरात बसून संपूर्ण गेम फिरवला आहे. शरद पवार यांनी या निवडणुकीत प्रचार केला नव्हता. मात्र, उमेदवार देताना पवारांनी स्व: लक्ष घातलं होतं. पारखून उमेदवार दिले होते. त्याचा फायदा या निवडणुकीत झालेला दिसत आहे. वयाच्या 85 व्या वर्षीही घरात बसून निवडणूक फिरवून पवारांनी आपणच खरे चाणक्य असल्याचं दाखवून दिलं आहे.

सुनेत्रा पवारांपुढे आव्हान

या निवडणुकीत खरी कसोटी अजितदादा गटाची होती. महायुतीत अजितदादा गटाच्या वाट्याला छत्रपती संभाजी नगरची जागा आली होती. अजितदादा गटाने या निवडणुकीत सतीश चव्हाण यांना उतरवलं होतं. सतीश चव्हाण विद्यमान आमदार असल्याने त्यांचा विजय सोपा असल्याचं मानलं जात होतं. मात्र, तरीही अजितदादा गटाकडून या निवडणुकीत प्रचाराचं रान उठवून देण्यात आलं होतं. स्वत: सुनेत्रा पवारांनीही प्रचारात लक्ष घातलं होतं. पण शरद पवार यांच्या रणनीतीपुढे अजितदादा गट सपशेल अपयशी ठरला आहे.

या निवडणुकीत अजितदादा गटाला अजितदादांची कमतरता भासली. अजितदादा हे आक्रमक नेते होते. कोणत्याही निवडणुकीत गाफिल राहायचे नाहीत. स्वत: ग्राऊंडवर उतरायचे आणि सांगून विजय खेचून आणायचे. दादांच्या निधनानंतर अजितदादा गटात हाच आक्रमकपणा असलेल्या नेतृत्वाची उणीव निर्माण झाली आहे. त्याचा फटका या निवडणुकीत अजितदादा गटाला बसलेला दिसतोय. या निवडणूक निकालातून अजितदादा गटासमोर नेतृत्त्वाचं आव्हान उभं राहिलं आहे. त्यावर अजितदादा गट कशी मात करतो हे येत्या काळात दिसून येईल.

पटेलांचं बोट कुणाकडे?

विधान परिषदेतील पराभवानंतर अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक ट्विट केलं आहे. आजचे विधान परिषदेचे निकाल हा एक स्पष्ट आणि महत्त्वाचा इशारा आहेत. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी, पक्षाचे प्राधान्यक्रम नव्याने ठरवण्यासाठी आणि संघटनेत सुधारणा करण्यासाठी तातडीने आणि कठोर आत्मपरीक्षण करावे लागेल, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. पटेल यांनी या ट्विटमध्ये अप्रत्यक्षपणे नेतृत्वाकडेच बोट दाखवल्याची चर्चा सुरू आहे.

Follow Us
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लव
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लवकरच आंदोलनाचा इशारा
एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
Ram Purnekar : एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर,
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर, खात्यात किती रुपये होणार जमा?
कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा
Raj Thackeray Sabha Update : कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा
एकनाथ शिंदेंवरील टीकेने नरेश म्हस्के आक्रमक; थेट पोलिस ठाण्यात तक्रार
एकनाथ शिंदेंवरील टीकेने नरेश म्हस्के आक्रमक; थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा शरद पवार घेणार आढावा;
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा शरद पवार घेणार आढावा; मुख्यमंत्र्यांशीही चर्चा
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांची आघाडी कायम
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांची आघाडी कायम, 21 फेऱ्यांनंतर निकाल जवळपास निश्चित
कौस्तुभ गावडेंनी टीकेला दिलं उत्तर; शिक्षक मतदारसंघात भाजपची बाजी
Kaustubh Gawade : कमी वय, मोठी संधी अन् विजय, कौस्तुभ गावडेंनी टीकेला दिलं उत्तर; शिक्षक मतदारसंघात भाजपची बाजी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी पाठिंबा दिल्याने... शिक्षक नेते...
Maharashtra MLC Election 2026 Result : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी पाठिंबा दिल्याने... सचिन सानप काय म्हणाले?