AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : भारत, चीन की जपान ? मशरूम उत्पादनात कोणता देश आहे जगात अव्वल ?

Mushroom : जगभरात मशरूम्सच्या 14 हजार प्रजाती आहे, पण त्यातल्या फक्त काही खाण्यायोग्य असतात. गेल्या दशकबरात मशरूम्सने बनलेले पदार्थ खाण्याचा ट्रेंड वाढला आहे. मशरूम्सचे जगभरात सर्वात जास्त उत्पादन कुठे होतं ?

GK : भारत, चीन की जपान ? मशरूम उत्पादनात कोणता देश आहे जगात अव्वल ?
| Updated on: Oct 28, 2026 | 3:41 PM
Share

गेल्या दशकभरात खाण्यापिण्यात मशरूम्सचा वापर वाढला आहे. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात हे चलन दिसलत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात मशरूम्सच्या 14 हजार जाती आहे, पण प्रत्येक मशरूम हा खाण्यास योग्य नसतो. त्यापैकी अवघ्या काही व्हरायची याच खाण्यास सुरक्षित असतात. ते पौष्टिक असतं आणि त्याने पोषणही होतं. पण काही मशरूम्स हे विषारी देखील असतात. त्यामुळेच ते योग्य आणि चांगल्या ठिकाणाहून खरेदी करणं महत्वाचं असतं. जगातले काही देश हे मशरूम्सच्या शेतीता आघाडीवर आहेत. त्यात सर्वात पहिला नंबर लागतो तो चीनचा

चीनमध्ये मशरूम्सचं इतकं प्रचंड उत्पादन होतं की दुसरा कोणताही देश त्याच्या आजूबाजूलाही भटकू शकत नाही. त्यानंतर जपान, भारत आणि अमेरिकेचा या यादीत नंबर लागतो.

आकडे काय सांगतात ?

संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (FAO) FAOSTAT डेटाबेसमधील 2024 सालच्या आकड्यांनुसार, जगात मशरूम्स आणि ट्रफलचं एकूण उत्पादन सुमारे 5.16 कोटी टन होतं. त्यामध्ये एकट्या चीनचा वाटा सुमारे 4.86 कोटी टन, म्हणजेच जवळपास 94.2 टक्के इतका आहे. तर 4.94 लाख टन उत्पादनासह (1 टक्का) जपानचा या यादीत दुसरा नंबर आहे. 3.47 लाख टनांसह भारत तिसऱ्या स्थानी आणि 2.99 लाख टन या आकड्यासह अमेरिकेचा या यादीत चौथा नबर आहे. यानंतप पोलंड, नेदरलंड, स्पेन आणि कॅनडा या देशाचांही नंबर लागतो.

CEFA या चीनमधील संस्थेच्या आकडेवारीनुसार, 2023 साली चीनमध्ये खाण्यायोग्य मशरूमचे उत्पादन 4.334 कोटी टन होतं आणि त्याचे मूल्य 396.56 अब्ज युआन इतकं होतं. वर्ष आणि गणनेच्या पद्धतीतील फरकामुळे या आकडेवारीत तफावत दिसते. मात्र, दोन्ही आकडेवारीतून मशरूम उत्पादनातील चीनचे वर्चस्व स्पष्ट होतं. CEFA नुसार, जागतिक उत्पादनात चीनचा वाटा 92 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

जपान आणि अमेरिकेची स्थिती

जपानच्या कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2021 साली जपानमध्ये मशरूमचे उत्पादन सुमारे 4.62 लाख टन इतकं झालं. गेल्या काही वर्षांपासून हे उत्पादन जवळपास याच पातळीवर स्थिर आहे. जपानमध्ये ताज्या शिताके मशरूमला सर्वाधिक किंमत मिळते. त्यानंतर बूना-शिमेजी आणि माइताके या मशरूमच्या जातींचा क्रमांक लागतो. तर अमेरिकेत पांढऱ्या रंगाच्या बटन मशरूमची सर्वाधिक प्रमाणात लागवड केली जाते. USDA-NASS च्या आकडेवारीनुसार, पेनसिल्व्हेनिया हे अमेरिकेतील सर्वाधिक मशरूम उत्पादन करणारे राज्य आहे.

मशरूम उत्पादात चीन आघाडीवर का ?

कारखान्यांप्रमाणे होणारी मशरूमची लागवड – CEFA च्या माहितीनुसार, गेल्या दशकात चीनमध्ये औद्योगिक स्तरावर मशरूम उत्पादनाचा विस्तार वेगाने झाला. त्यामुळे 2014 मधील 3.27 कोटी टन उत्पादन वाढून 2023 मध्ये ते 4.33 कोटी टनांवर पोहोचले.

व्हरायटी – चीनमध्ये मशरूमच्या 1 हजारांहून अधिक प्रजाती आढळतात. शिताके, ऑयस्टर, एनोकी, वुड इअर आणि बटन मशरूम यांसारख्या अनेक जातींची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. काही आकडेवारीनुसार, जागतिक शिताके उत्पादनात चीनचा वाटा जवळपास 98 टक्के आहे.

गरीबी हटवण्याचे धोरण – एका संशोधनानुसार, चीनमधील 400 हून अधिक गरीबबहुल भागांमध्ये खाण्यायोग्य मशरूमची लागवड करणं हे उत्पन्नाचं साधन बनलं आहे. या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडूनही विविध सुविधा आणि मदत देण्यात आली.

देशांतर्गत बाजारपेठेची मोठी मागणी – चीनच्या प्रचंड लोकसंख्येमुळे देशांतर्गत बाजारपेठेत मशरूमला मोठी मागणी आहे. उत्पादनाचा मोठा हिस्सा देशांतर्गत बाजारातच विकला जातो. त्यामुळे वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मशरूमचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर केलं जातं.

चीन कुठे एक्सपोर्ट करत मशरूम्स ?

मशरूम उत्पादनात चीन आघाडीवर असला, तरी तेथील लोकसंख्या मोठी असल्यामुळे देशांतर्गतच मशरूमचे ग्राहकही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र त्याव्यतिरिक्तही चीन देशातील 120 पेक्षा जास्त देशांमध्ये मशरूमची निर्यात करतो. यामध्ये जपान, दक्षिण कोरिआ, आसियान देश, अमेरिका आणि युरोपीय संघातील देशांचा समावेश आहे. चीनमध्ये उत्पादित होणाऱ्या मशरूमचा जपान हा सर्वात मोठा आयातदार आहे.

Follow Us
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लव
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लवकरच आंदोलनाचा इशारा
एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
Ram Purnekar : एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर,
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर, खात्यात किती रुपये होणार जमा?
कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा
Raj Thackeray Sabha Update : कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा
एकनाथ शिंदेंवरील टीकेने नरेश म्हस्के आक्रमक; थेट पोलिस ठाण्यात तक्रार
एकनाथ शिंदेंवरील टीकेने नरेश म्हस्के आक्रमक; थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा शरद पवार घेणार आढावा;
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा शरद पवार घेणार आढावा; मुख्यमंत्र्यांशीही चर्चा
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांची आघाडी कायम
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांची आघाडी कायम, 21 फेऱ्यांनंतर निकाल जवळपास निश्चित
कौस्तुभ गावडेंनी टीकेला दिलं उत्तर; शिक्षक मतदारसंघात भाजपची बाजी
Kaustubh Gawade : कमी वय, मोठी संधी अन् विजय, कौस्तुभ गावडेंनी टीकेला दिलं उत्तर; शिक्षक मतदारसंघात भाजपची बाजी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी पाठिंबा दिल्याने... शिक्षक नेते...
Maharashtra MLC Election 2026 Result : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी पाठिंबा दिल्याने... सचिन सानप काय म्हणाले?