AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra MLC Election Result : हवा फुस्स… महायुतीला मोठा धक्का, स्वप्न भंगलं? विधानपरिषदेत मोठा उलटफेर

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या निकालांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. महायुतीला एकतर्फी विजयाची अपेक्षा असताना, महाविकास आघाडीने अनपेक्षितरित्या जोरदार मुसंडी मारली. ५ जागांपैकी महायुतीला ३ तर महाविकास आघाडीला २ जागा मिळताना दिसत आहेत, ज्यामुळे महायुतीचे सर्व जागा जिंकण्याचे स्वप्न भंगले. हा महायुतीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Maharashtra MLC Election Result : हवा फुस्स... महायुतीला मोठा धक्का, स्वप्न भंगलं? विधानपरिषदेत मोठा उलटफेर
maharashtra leaderImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 28, 2026 | 10:50 AM
Share

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची कालपासून मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीत महायुतीचा एकतर्फी विजय होण्याची शक्यता वर्तवली जात होती. महायुतीच्या नेत्यांनी तशी फिल्डिंगही लावली होती. त्यामुळे राज्यात महायुतीचीच हवा राहणार असल्याचं चित्र होतं. पण महाविकास आघाडीने महायुतीचा विजय रथ रोखल्याचं चित्र आहे. 5 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत महायुतीला 3 तर महाविकास आघाडीला 2 जागा मिळताना दिसत आहे. म्हणजे सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचं महायुतीचं स्वप्न भंगताना दिसत आहे. त्यामुळे महायुतीसाठी हा मोठा फटका असल्याचं सांगितलं जात आहे. अंतर्गत गटबाजीचा महायुतीला फटका बसल्याचं चित्र आहे.

मराठवाड्यात महाविकास आघाडी

मराठवाड्यात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतापसिंह पाटील हे आघाडीवर आहेत. तर महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण पिछाडीवर आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांना 73931 मते मिळाली आहेत. तर महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना 60768 मते मिळाली आहेत. रविराज साबळे यांना 19835 मते मिळाली आहेत. प्रतापसिंह पाटील 13163 मतांनी आघाडीवर आहेत. या निवडणुकीत शिंदे सेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा उघड प्रचार केला होता. त्याचा फटका चव्हाण यांना बसताना दिसत आहे.

नागपूरमध्ये कराळे ठरवणार

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीची सुधाकर कोहळे हे आघाडीवर आहेत. त्यांना 60,924 मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे अभिजीत वंजारी यांना 56,630 मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांना 24,249 मते मिळाली आहेत. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये महायुतीचे कोहळे आघाडीवर दिसत असले तरी नितेश कराळे यांनी दुसऱ्या पसंतीची मते अभिजीत वंजारी यांना द्यायला सांगितलं होतं. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये गेम पालटणार की आहे तीच परिस्थिती राहणार हे पाहावं लागणार आहे.

अमरावतीत शिंदेंचा डंका

अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाचा उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे उमेदवार किरण सरनाईक यांना 8575 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या अदिती पोहरे यांना 4925 मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना 4921 मते मिळाली आहेत. त्यामुळे सरनाईक यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

पुण्यात भाजप आघाडीवर

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे. भाजपचे कौस्तुभ गावडे यांना 17600 मते मिळाली आहेत. काँग्रेसचे जयंत आसगावकर यांना 8350 तर शिंदे गटाचे सचिन सानप यांना 11328 मते मिळाली आहेत. त्यामुळे पुणे राखण्यात भाजप यशस्वी होताना दिसत आहे.

पुणे पदवीधरमध्ये शरद पवारांचा जलवा

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या स्मिता जाधव यांना 1 लाख 2 हजार मते मिळाली आहेत. तर शरद पवार गटाच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांना 1 लाख 12 हजार 400 मते मिळाली आहेत. तर उद्धव ठाकरे गटाचे सुनील मोदी यांना 3066 मते मिळाली आहेत. त्यामुळे या मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र आहे.

Follow Us
विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव
Maharashtra MLC Result 2026 Complete : विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात मोठा ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव, सानप-गावडे यांच्यात चुरस
पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा दावा
Sanjay Raut : पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर तर....
Marathwada MLC Election Results 2026 : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर, सतीश चव्हाण पिछाडीवर
प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको; मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदेंच्या अटकेची मागणी
सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
Bhimashankar Torrent Project : Raj Thackeray : सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर, सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत...
Marathwada MLC Election Result : मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत नाराजी व्यक्त
शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद
Shivsena : शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद; महाराष्ट्राचं लक्ष
पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु....
Maharashtra MLC Result 2026 : पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु
20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा..
Marathwada MLC Election Results 2026 : 20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा पदवीधरचा निकाल बदलणार?
पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी?
Maharashtra MLC Election Final Results 2026 : पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी? निकालाकडे सर्वांचं लक्ष