
उन्हाळा सुरू झाला आहे. कडक उन पडत आहे. कमाल तापमाणात देखील मोठी वाढ झाली आहे. तापमान आणि उन्हामुळे अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना मुंबईतील खारमधून समोर आली आहे. खारमध्ये असलेल्या 'indusand'बँकेच्या तळमजल्यावर मंगळवारी रात्री आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

मुंबईतील खारमध्ये असलेल्या indusand बँकेच्या तळमजल्यावर रात्री अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने पाच गाड्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दालाकडून वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

रात्रीची वेळ असल्याने बँकेत कोणीही नव्हते, त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र या आगीत बँकेचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

उन्हाळा वाढत आहे, उन्ह्याळ्यामध्ये आगीची विशेष काळजी घ्यावी लागते. वातावरणात उष्णता असल्याने आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.