Diesel Price Hike: पेट्रोलनंतर आता डिझेल महाग;इतके कडाडले भाव, अपडेट काय?
Diesel Price Hike: आखाती युद्धाचे दुष्परिणाम सर्वत्र दिसत आहेत. गॅस सिलेंडरच्या तुटवड्याने ग्राहक हैराण आहेत. तर सरकार तुटवडा नसल्याचा दावा करत आहे. गॅस सिलेंडरची किंमत 60 रुपयांनी महागली आहे. सुपर आणि स्पीड पेट्रोल आज 2 रुपयांनी महागले आहे. तर डिझेलचा पण भाव इतका वधारला आहे.

आखातात युद्ध पेटले आहे. इराण-इस्त्रायल आणि अमेरिकेत युद्ध सुरू आहे. युद्ध अजून किती दिवस लांबेल हे सांगता येत नाही. त्याचा परिणाम इंधन आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर झाला आहे. देशात गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ झाली आहे. तर आज पेट्रोलची दरवाढ दिसून आली.

राज्यात साध्या पेट्रोलचे दर स्थिर आहेत. मात्र स्पीड पेट्रोलच्या दरात 2 रुपयांची वाढ दिसून आली. सोलापुरातील पेट्रोल पंपावर साधे पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. साधे पेट्रोल 104 रूपये तर स्पीड पेट्रोल 111 वरून 113 रूपये झाले. साधं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आहेत त्याच आहेत मात्र स्पीड पेट्रोल 2 रुपयांनी वाढले आहे.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (IOC) इंडस्ट्रियल डिझलची किंमत वाढवली आहे. या डिझेलची किंमत 87.67 रुपयांहून थेट 109.59 प्रति लिटरवर पोहचली आहे. डिझेलची किंमत प्रति लिटर 21.92 रुपयांनी वाढली आहे. त्याचा थेट परिणाम उद्योग विश्व, वाहतूक आणि वीज उत्पादनावर होणार आहे.

IOC ने इंडस्ट्रियल डिझेलच्या (Industrial Diesel) किंमतीत मोठी वाढ केली आहे. या डिझेलची किंमत कालपर्यंत 87.67 प्रति लिटर होती. तर नवीन किंमत आता 109.59 रुपये प्रति लिटरवर पोहचल्या आहेत. एकाच फटक्यात 21.92 प्रति लिटर वाढ झाली.

इंडस्ट्रीयल डिझेलला HSD (High Speed Diesel) असेही म्हणतात.साधारण वाहनात या डिझेलचा वापर करण्यात येत नाही. तर औद्योगिक कामासाठी त्याचा वापर करण्यात येतो. Industrial / Bulk Diesel म्हणून त्याची विक्री होते.

दरम्यान आखाती देशात गुरुवारी कच्चे तेलाचा भाव घसरला. क्रूड ऑईल 119 डॉलर प्रति बॅरलपेक्षा 14 डॉलर प्रति बॅरलने स्वस्त झाले. तर अमेरिकन क्रूड डब्ल्यूटीआयचा भाव गुरुवारी 100 डॉलर प्रति बॅरलहून अजून घसरला. हे इंधन 8 डॉलर प्रति बॅरल इतके कमी झाले.