
स्मार्टफोन हातात आहे, पण त्यात इंटरनेट चालत नसेल तर आपली चिडचिड होते. कंपन्या दावा करतात 5G नेटवर्कचा पण प्रत्यक्षात अनेक ठिकाणी 3G चे नेटवर्क पण मिळत नाही. अथवा स्मार्टफोनमधील काही अडचणी त्यासाठी कारणीभूत ठरतात.

नेटवर्कच्या अडचणीचे सर्वात मोठे कारण कमकुवत सिग्नल आहे. जर तुम्ही अशा ठिकाणी आहात, जिथे सिग्नल कमकुवत आहे. तर तुमचे इंटरनेट कासवापेक्षा पण मंद होईल. त्यामुळे ती जागा बदलावा. इतर ठिकाणी नेट सर्च करा.

इंटरनेट ट्रॅफिक असेल, एखाद्या ठिकाणी अधिक वापरकर्ते असतील तर नेटवर्क जाम होते. इंटरनेट स्लो होते आणि कॉल पण मध्येच ड्रॉप होतो. अशावेळी वायफाय असेल तर त्याचा वापर करा. कमी डेटा वापरणाऱ्या Apps चा वापर करा.

फोनचा सॉफ्टवेअर नेहमी अपडेट ठेवा. जुने सॉफ्टवेअर नेटवर्क जोडणीसाठी अडचणीचे ठरते. फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन नियमीतपणे अपडेट करा.

खराब सिम कार्ड नेटवर्क अडचण आणते. सिम कार्ड काडून त्यातील गडबड शोधा. त्यात धुळ असेल तर ते स्वच्छ करा. तरीही नेटवर्कचा इश्यू येत असेल तर सिम कार्ड बदलवा.

कॉडलेस फोन अथवा इतर वायरलेस नेटवर्क तुमच्या जवळपास असतील तर तुमच्या मोबाईलचे सिग्नल कमकुवत करु शकतात. त्यामुळे योग्य जागा शोधा. तिथे कदाचित नेट वेगाने धावेल.