
आयपीएलच्या 14 व्या मोसमात (IPL 2021) आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात लढत रंगणार आहे.

कोलकाताने वानखेडे स्टेडियमवर 9 सामने खेळले आहेत. कोलकाताला या 9 पैकी केवळ 1 सामन्यातच विजय मिळवता आला. तर उर्वरित 8 मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

उभयसंघ आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 23 वेळा आमनेसामने भिडले आहेत. त्यापैकी 12 सामन्यात कोलकाताने विजय मिळवला आहे. तर राजस्थानने 10 वेळा मात केली आहे.

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने कोलकाता विरुद्ध सर्वाधिक 205 धावा केल्या आहेत. तर श्रेयस गोपाळने कोलकाताच्या सर्वाधिक फलंदाजांना बाद केलं आहे.

तसेच कोलकाताच्या दिनेश कार्तिकने राजस्थान विरुद्ध 233 रन्स केल्या आहेत. तर सुनील नारायणने 10 विकेट्स घेतल्या आहेत.