AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शुभ मुहूर्त ठरला! इंदोरीकर महाराजांच्या मुलीची लग्नपत्रिका व्हायरल, लग्न कधी? कुठे? प्रमुख पाहुणे कोण कोण?

Indorikar Maharaj Daughter Marriage : इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नची पत्रिका समोर आली आहे. या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती देण्यात आली आहे. लग्न कधी आहे आणि किती वाजता आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शुभ मुहूर्त ठरला! इंदोरीकर महाराजांच्या मुलीची लग्नपत्रिका व्हायरल, लग्न कधी? कुठे? प्रमुख पाहुणे कोण कोण?
Indorikar Maharaj Daughter Marriage DateImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Apr 23, 2026 | 8:05 PM
Share

राज्यातील प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज नेहमीच चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी मुलीच्या साखरपुड्यात मोठ्या प्रमाणात खर्च केल्याने ते चर्चेत आले होते. लग्न साधे करा, खर्च कमी करा असं म्हणणार्‍या इंदोरीकर महाराजांनी मुलीच्या साखरपुड्यात लाखोंचा खर्च केला होता. त्यामुळे त्यांच्यावर सडकून टीकाही झाली होती. अशातच आता इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नची पत्रिका समोर आली आहे. या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कधी आहे लग्न?

इंदोरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह प्रसिद्ध उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचा मुलगा साहिल यांच्याशी होणार आहे. रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी सायंकाळी 6.50 मिनिटांनी पार पडणार आहे. एस आर थोरात डेअरी जवळ राजापूर रोड, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे पार पडणार आहे. त्याआधी 2 मे रोजी सायंकाळी 6 वाजता मालपाणी हेल्थ क्लब, संगमनेर येथे हळदी समारंभ पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याला वारकरी सांप्रदायातील अनेक दिग्गज किर्तनकार आणि समाज प्रबोधनकार हजर राहून आशीर्वाद देणार आहेत. तसेच विवाहाच्या दिवशी 4.30 ते 6.30 या कालावधीत ह. भ. प. डॉ नारायण महाराज जाधव (आळंदी) यांचे किर्तन होणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांना निमंत्रण ?

इंदोरीकर महाराज यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका दिली आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी इंदोरीकर महाराज यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत लग्नाचे निमंत्रण दिले. साखरपुडा झाल्यानंतर ट्रोल झाल्यानंतर इंदोरीकर महाराज यांनी मुलगी ज्ञानेश्वरीचा विवाह अधिक थाटामाटत करणार अशी भूमिका जाहीर केली होती, त्यानंतर आता हे लग्न अधिक थाटामाटात होणार आहे.

इंदोरीकर महाराजांचा जावई काय करतो?

इंदोरीकर महाराज यांचे होणारे जावई साहिल चिलाप हे बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती समोर येत आहे, त्यांचा मुंबईमध्ये मोठा व्यावसाय आहे. समोर आलेल्या माहितीनुसार साहिल चिलाप हे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमधील मुळचे रहिवासी आहेत, ते उच्च शिक्षित असून, गावाकडे त्यांची मोठी बागायती शेती आहे. त्यामुळे आता या विवाह सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन