Amravati Teacher MLC : अमरावतीत किरण सरनाईकांसमोर कुणाचं आव्हान? 23 तासांपासून मतमोजणी, कोण मारणार बाजी?
Maharashtra Teacher Graduate MLC Election Result 2026: अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक यंदा बहुकोणी झाली. दिग्गज मैदानात उतरले आणि सामना चुरशीचा झाला आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांच्यासमोर मित्र पक्षांनी आव्हान उभं केलं. मागील 18 तासांपासून सुरू असलेल्या मतमोजणीत कोणी मारली बाजी?

Amravati Teacher Constituency Election Result 2026: अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक यंदा केवळ विधान परिषदेची निवडणूक राहिलेली नाही. शिक्षक संघटनांच्या प्रभावातून राजकीय वर्चवस्वाची लढाई झाली आहे. ही लढाई आता व्यक्ती प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळेच यंदा बंडाळी, अंतर्गत पेच आणि शह-काटशह देण्याच्या प्रयत्न निवडणूक बहुकोणी झाली. दिग्गज मैदानात उतरले आणि सामना चुरशीचा झाला आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांच्यासमोर मित्र पक्षांनी आव्हान उभं केलं. तर महाविकास आघाडीसह इतरही उमेदवारांनी शड्डू ठोकले. रात्रभर मतमोजणी सुरू आहे. त्यातून आलेला कल किरण सरनाईक यांच्यासाठी दिलासा देणारा आहे.
किरण सरनाईक आघाडीवर
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ मतमोजणी अपडेट समोर आली आहे. मागील 23 तासांपासून मतमोजणी सुरू आहे. 19 व्या फेरी अंती शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक 3535 हजार मतांनी आघाडीवर आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे बंडोखर उमेदवार श्रीकांत देशपांडे दुसऱ्या क्रमांकावर तर काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
19 व्या फेरीअंती शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांना 8348 मते
तर काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांना 4786 मते
शिवसेनेचे बंडखोर 4813 श्रीकांत देशपांडे यांना मते
तर यापूर्वी 15 व्या फेरी अंती शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक 3517 हजार मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे दुसऱ्या क्रमांकावर तर शिंदेंच्या शिवसेनेचे बंडोखर उमेदवार श्रीकांत देशपांडे तिसर्या क्रमांकावर आहेत. गेल्या काही फेऱ्यांचा विचार करता किरण सरनाईक यांचे पारडे जड असल्याचे दिसते. तेराव्या फेरीअंती शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांना 8269 मते तर काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांना 4752 मते शिवसेनेचे बंडखोर श्रीकांत देशपांडे यांना 4732 मते मिळाली होती. तेराव्या फेरी अंती शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक 3489 हजार मतांनी आघाडीवर होते. काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे दुसऱ्या क्रमांकावर तर शिंदेंच्या शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे तिसर्या क्रमांकावर होते.
बहुकोणी निवडणुकीत शिक्षकांमध्ये कोण लोकप्रिय?
शिक्षक संघटनांचा अमरावती मतदारसंघातील दबदबा नवीन नाही. विदर्भाच्या शिक्षक चळवळीचे महामेरू माजी आमदार प्रा. डॉ. बी. टी. देशमुख यांनी सलग 30 वर्षे आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी विधान परिषद गाजवली. त्यांनी अमरावती शिक्षक मतदारसंघाचा लौकिक वाढवला. ते विदर्भाच्या शैक्षणिक आणि वैचारिक क्षेत्राचे मार्गदर्शक होते. शिक्षकांचे आणि पदवीधरांची नाळ त्यांनी ओळखली होती. हाच रतीब आणि हाच वारसा चालवण्याचे मोठे आवाहन या मतदारसंघातील उमेदवारांवर आहे. आता पक्षीय राजकारण आले असले तरी शिक्षक संघटनांचा मोठा दबदबा आहे.
या मतदारसंघात यंदा शिवसेनेचे किरण सरनाईक, माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे, भाजपमधील संगीता शिंदे, काँग्रेसच्या प्रा. आदिती पोहरे यांच्यासह इतर ही अनेकांनी दावा सांगितला आहे. यंदा सरनाईक यांची वाट बिकट मानली जात होती. पण जी आकडेवारी समोर येत आहे. त्यातून या बहुकोणी निवडणुकीत सरनाईकांनी आपली पकड मजबूत असल्याचे दाखवून दिले आहे.
