Harshwardhan Sapkal | गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले; असं विधान म्हणजे…
जैन मुनी निलेश चंद्र यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या राजकीय आणि सामाजिक चर्चांना उधाण आलं आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येसंदर्भात नथुराम गोडसेच्या भूमिकेचं समर्थन केल्याची माहिती समोर आल्यानंतर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना या वक्तव्याचा तीव्र निषेध केला.
जैन मुनी निलेश चंद्र यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या राजकीय आणि सामाजिक चर्चांना उधाण आलं आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येसंदर्भात नथुराम गोडसेच्या भूमिकेचं समर्थन केल्याची माहिती समोर आल्यानंतर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. “हत्येचं समर्थन करणं हे भारतीय संस्कृतीला धरून नाही. अशा प्रकारचं वक्तव्य विकृत मानसिकतेचं द्योतक आहे,” असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
तसेच, जैन धर्माच्या मूलभूत ‘अहिंसा’ तत्त्वाच्या विरोधात जाणारं हे विधान असल्याचंही त्यांनी नमूद केलं. “अहिंसा हा जैन धर्माचा मुख्य आधार आहे. अशा वक्तव्यांमुळे त्या तत्त्वालाच बाधा पोहोचते,” असंही सपकाळ म्हणाले. दरम्यान, या प्रकरणामुळे धार्मिक आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, संबंधित वक्तव्यावर व्यापक निषेध व्यक्त केला जात आहे.
Published on: Apr 23, 2026 04:03 PM
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर

