IPL 2021 Auction | 8 संघातील सर्वाधिक मानधन घेणारे खेळाडू, नंबर वन कोण?

विराट कोहली (Virat Kohli) हा आयपीएलमधील (IPL) सर्वाधिक मानधन घेणारा क्रिकेटपटू आहे. आयपीएल 2021 मध्ये धोनी आणि रोहितपेक्षा त्याला जास्त मानधन मिळालं आहे.

Sanjay patil | Updated on: Feb 17, 2021 | 4:26 PM
1 / 9
आयपीएल स्पर्धा म्हणजे  षटकार चौकार आणि  पैशांचा पाऊस. आयपीएलमुळे आतापर्यंत अनेक युवा खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. तसेच अनेक दिग्गज खेळाडूंनी छप्परफाड कमाई केली आहे. या निमित्ताने आपण एकूण 8 संघातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडू कोण आहेत हे पाहणार आहोत.

आयपीएल स्पर्धा म्हणजे षटकार चौकार आणि पैशांचा पाऊस. आयपीएलमुळे आतापर्यंत अनेक युवा खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. तसेच अनेक दिग्गज खेळाडूंनी छप्परफाड कमाई केली आहे. या निमित्ताने आपण एकूण 8 संघातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडू कोण आहेत हे पाहणार आहोत.

2 / 9

आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज्सच्या (Chennai Super Kings) महेंद्रसिंह धोनीने सर्वाधिक (Mahendra Singh Dhoni) कमाई केली आहे. धोनी एका मोसमात खेळण्यासाठी 15 कोटी घेतो. धोनीने 2021 च्या कमाईसह एकूण 152 कोटींची कमाई केली आहे. चेन्नईने धोनीला या आगामी मोसमासाठी रिटेन केलं आहे. धोनीने 13 व्या मोसमातील 14 सामन्यांमध्ये 200 धावा केल्या होत्या.

3 / 9

धोनीनंतर सर्वाधिक कमाईच्या बाबतीत मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माचा क्रमांक लागतो. रोहित एका मोसमात खेळण्यासाठी 15 कोटी आकारतो. रोहितने आयपीएलमधून 146 कोटींची कमाई केली आहे. मुंबईने रोहितला रिटेन केलं आहे. रोहितने गत मोसमातील 12 सामन्यात 332 धावा केल्या होत्या.

4 / 9

एकूण कमाईबाबत तिसरा क्रमांक विराट कोहलीचा आहे. तसेच विराट एका मोसमात सर्वाधिक मानधन आकारणारा खेळाडू आहे. विराटची या 14 मोसमाीतल फी 17 कोटी इतकी आहे. त्याने आतापर्यंत 143 कोटी कमावले आहेत. विराटला बंगळुरुने रिटेन केलं आहे. विराटने गेल्या मोसमात 15 सामन्यात 466 धावा केल्या होत्या.

5 / 9

पॅट कमिन्स आयपीएलमध्ये कोलकाताकडून खेळतो. कोलकाताने पॅटसाठी 15. 5 कोटी मोजून रिटेन केलं आहे. पॅटने 13 व्या मोसमातील 14 सामन्यात 146 धावा केल्या. तसेच 12 विकेट्सही घेतल्या.

6 / 9

सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने गेल्या मोसमात आपल्या नेतृत्वात हैदराबादला टॉप 4 मध्ये पोहचवलं होतं. वॉर्नरने या मोसमातील 16 सामन्यात तब्बल 548 धावा केल्या. वॉर्नरला 14 व्या मोसमासाठी रिटेन केलं आहे. वॉर्नरसाठी या मोसमातही फ्रँचायजीने 12.5 कोटी मोजले आहेत.

7 / 9

राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला रिटेन करण्यात आले आहे. स्टोक्सचे या मोसमासाठीचे 12. 5 कोटी इतके मानधन आहे. स्टोक्सने गेल्या मोसमातील 8 सामन्यात 285 धावांसह 2 विकेट्सही घेतल्या होत्या.

8 / 9

केएल राहुलने गेल्या मोसमात कॅप्टनशीप, फलंदाज आणि विकेटकीपिंग अशा तिन्ही भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. केएलने केलेल्या या कामगिरीसाठी त्याला रिटेन करण्यात आलं आहे. केएलने गेल्या मोसमातील 14 मॅचेसमध्ये 670 धावा केल्या होत्या. केएल हा 13 व्या मोसमातील ऑरेंन्ज कॅप होल्डर ठरला होता. आयपीएलमधील एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेन्ज कॅप देण्यात येते. केएलचे या मोसमातील मानधन हे 11 कोटी इतके आहे.

9 / 9

मुळचा उत्तराखंडचा असलेला रिषभ पंत आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळतो. पंतने गेल्या पर्वात 14 सामन्यांमध्ये 343 रन्स केल्या होत्या. पंतला या 14 व्या मोसमासाठी रिटेन केलं आहे. पंतसाठी दिल्ली टीम मॅनेजमेंटन 8 कोटी रुपये मोजले आहेत. पंत आयपीएलच्या 13 व्या मोसमानंतर सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us