
आयपीएस तनुश्री शोपिया यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्समधून असिस्टेंट कमांडेंट म्हणून केली. लग्नानंतर घर आणि नोकरीची जबाबदारी सांभाळत त्यांनी यूपीएससीची तयारी सुरु केली. यूपीएससी क्रॅक करुन इतिहास निर्माण केला.

सेवानिवृत्त सीआरपीएफ डीआयजीची मुलगी असलेल्या तनुश्री सीआरपीएफमध्ये 2014 मध्ये असिस्टेंट कमांडेंट झाल्या. त्यानंतर त्यांचे 2015 मध्ये लग्न झाले. लग्न झाल्यानंतर यूपीएससीची तयारी सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नोकरी आणि घर सांभाळत आपले लक्ष्य गाठण्याकडे प्रवास सुरु केला.

परिवार आणि नोकरी सांभाळत 2016 मध्ये यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यानंतर 2017 मध्ये त्या आयपीएस अधिकारी बनल्या. त्या जम्मू काश्मीरमध्ये आपली सेवा देत आहेत.

तनुश्री सोशल मीडिया नेहमी सक्रीय असतात. इंस्टाग्रामवर त्यांचे दीड लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्या सोशल मीडियात आपली पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफसंदर्भातील अपडेट्स देत असतात.

24 एप्रिल 1987 रोजी जन्मलेल्या तनुश्री या 2017 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्याचे शालेय शिक्षण बिहारमधील मोतीहारी शाळेत झाले. त्यानंतर बारावीत त्यांनी बोकारो येथील डीएवी पब्लिक स्कूलमधून केली. इतिहासात त्यांनी बीएची पदवी घेतली.