
आमिर खान याची लेक इरा खान हिने काही 3 जानेवारी रोजीच मुंबईमध्ये नुपूर शिखरे याच्यासोबत कोर्टात लग्न केले. आता उदयपूर येथे रितीरिवाजानुसार यांचा विवाह सोहळा हा पार पडणार आहे.

आमिर खानसह सर्वजण उदयपूरमध्ये दाखल देखील झाले आहेत. नुकताच आता इरा खान हिने काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये चक्क लग्नाच्या ठिकाणी सर्वजण व्यायाम करताना दिसत आहेत. आता इरा खान हिने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोसोबतच इरा खान हिने एक खास कॅप्शन देखील शेअर केले आहे. इरा खान हिने लिहिले की, जोपर्यंत खूप सारा व्यायाम नाही करणार तोपर्यंत आमचे लग्न होऊ शकते?