Baba Vanga: बाबा वेंगाची ती भविष्यवाणी खरी ठरणार? भंडारा तालुक्यात अक्रितच घडलं! संशोधकांची टीम घटनास्थळी दाखल

Baba Vanga: बाबा वेंगा यांनी आजवर अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यामधील 2026मध्ये कोणत्या खऱ्या होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच महाराष्ट्रातील भंडाता येथे अक्रित घडलं आहे. आता नेमकं काय घडलं वाचा...

| Updated on: Jan 13, 2026 | 12:31 PM
1 / 5
प्रसिद्ध भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांनी 2026साठी अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. आता या भविष्यवाण्या खऱ्या होणार का याकडे जगाचे लक्ष लागले आहे.  2026 मध्ये जगभरात युद्धाची स्थिती राहील, युद्धामुळे जगात मोठं नुकसान होईल, एआयची (AI) वाढत असलेली ताकद, परग्रहावरील जीव पृथ्वीवर येणार तसेच ज्वालामुखीचा उद्रेक अशा अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. आता महाराष्ट्रातील भंडारा जिल्हात घडलेल्या घटनेमुळे सर्वांना धक्काच बसला आहे.

2 / 5
आकाशातून ऋतूनुसार आकाशातून पाऊस पडतो तर काही ठिकाणी बर्फ पडतो. पण भंडारा तालुक्यातील परसोडी परिसरात आकाशातून चक्क दगडाचे दोन तुकडे पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे दगडाचे तुकडे उल्केचे तुकडे असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

3 / 5
ही घटना जवाहरनगर ऑडनस फॅक्टरी परिसरातील परसोडी गावातील सुगत बुद्ध विहाराजवळील मोकळ्या ले-आउटमध्ये घडली. लगतच्या घरासमोर शेकोटी पेटवत असलेल्या काही लहान मुलांना आकाशातून जळत काहीतरी खाली पडताना दिसले.

4 / 5
काही वेळानंतर जवळ जाऊन पाहिले असता आग विजलेले सिमेंटसदृश रंगाचे दोन हलक्या वजनाचे दगड त्यांना दिसले. त्यांनी याची माहिती परिसरातील नागरिकांना दिली. किशोर वाहने यांनी याबाबत पोलिसांना माहिती कळवले.

5 / 5
दगडांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, कलकत्त्याहून वरिष्ठ वैज्ञानिक पथक तपासणीसाठी येणार असल्याचे समोर आले आहे. हे दगड नेमके कशाचे याच शोध घेतला जाणार असल्याची माहिती  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदार यांनी दिली आहे.