६ तासांची झोप पुरेशी असते का ? वयानुसार किती वेळ झोप हवी ?

वयाच्या नुसार किती तास झोपणे उपयोगी असते, याबाबत कमी लोकांना माहिती आहे. नॉर्मली सहा ते आठ तास झोपायला हवे. यात वयाच्या फॅक्टर नेमका का आहे. चला तुम्हाला एक्सपर्ट काय म्हणताहेत हे पाहूयात..

| Updated on: Sep 24, 2026 | 6:39 PM
1 / 6
 सहा तासांची झोप आपल्याला पुरेशी असते ? बहुतांशी  प्रोढांसाठी दररोज सहा तासांची झोप कमी मानली जाते. आपल्या झोपे दरम्यान आराम करण्यासोबतच मेंदू आणि शरीराच्या अनेक आवश्यक प्रक्रिया करण्यासाठी वेळ मिळतो. यासाठी केवळ हे पाहणे गरजेचे नाही की तुम्ही झोपत आहात. हे देखील पाहणे गरजेचे आहे की तु्म्ही किती वेळ आणि किती चांगली झोप घेता हे देखील महत्वाचे आहे.

2 / 6

डॉक्टर गोपाळ जी.शर्मा ( सिनियर कन्सलटन्ट इंटर्नल मेडिसिनी, कैलाश दीपक हॉस्पिटल ) म्हणणे आहे की वयासोबतच झोपेची गरज बदलते. नवजात बाळांना सर्वात झोपेची गरज असते. कारण या वयात शरीर आणि मेंदूचा विकास वेगाने होत आहे.त्यांना १४ ते १७ तास झोपेची गरज असते.

3 / 6

४ ते ११ महिन्यांच्या मुलांना १२ ते १५ तास, तर १ ते २ वर्षांच्या मुलांना ११ ते १४ तासांची झोप हवी. ३ ते ५ वर्षांच्या मुलांना १० ते १३ तासांची झोप हवी असते. तर ६ ते १२ वर्षांच्या मुलांना ९ ते १२ तास झोपणे गरजेचे असते.

4 / 6

१३ ते १७ वर्षांच्या टीनएजर्सना ८ ते १० तासांची झोपेची गरजेची असते. १८ ते ६४ वर्षांच्या वयस्कांना किमान ७ तास झोप गरजेची असते. ६५ वर्ष आणि जास्त वयाच्या लोकांना ७ ते ८ तासांच्या झोपेची गरज असते.

5 / 6

डॉक्टर म्हणतात तुम्ही रोज केवळ सहा तास झोपत असाल तर कमी झोपेमुळे दिवसभर थकवा, चिडचिडपणा, एकाग्रतेत अडचणी आणि काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. केवळ तास पूर्ण करणेही पुरेसे नाही.

6 / 6

जर तुम्ही ७ ते ८ तास झोपल्यानंतर सतत थकवा जाणवत असेल, वारंवार झोप मोड होत असेल. सकाळी उठल्यानंतर ताजेतवाने वाटत नसेल. तर झोपेची गुणवत्ता वा इतर कोणत्याही समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us