QR कोड खरा की खोटा? पेमेंट करण्यापूर्वी अशी खात्री करा, सोपा उपाय जाणून घ्या

QR code Real or Fake: खोटा क्युआर कोड वापरून फसवणुकीचे प्रकार वरचेवर घडतात. अशावेळी पेमेंट करण्यापूर्वी हा कोड खरा की खोटा याची तुम्हाला खात्री करावी लागेल. त्यासाठी हा सोपा उपाय करता येईल.

| Updated on: Mar 12, 2026 | 4:05 PM
1 / 6
QR code Real or Fake:  सध्या दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत डिजिटल पेमेंट करण्यात येते. एक रुपयांच्या चॉकलेटपासून ते मोठ्या सामानापर्यंत, एसटीतील प्रवास असो की पेट्रोल पंपावरील पेमेंट सगळीकडे डिजिटल पेमेंट केले जाते. त्यासाठी QR कोड स्कॅन करण्यात येतो. पण अनेकदा त्यात फसगत होऊ शकते.

2 / 6
क्युआर कोड स्कॅन करून पेमेंट करणे अगदी सोप्पं असलं तरी तितकंच ते धोकादायक आहे. अनेकजण खोटा क्युआर कोड लावून लोकांची मोठी फसवणूक करतात. अशावेळी खोटा क्युआर कोड कसा ओळखायचा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो.

3 / 6
फसवणुकीसाठी मूळ क्युआर कोडवर दिसरे क्युआर कोड चिकटवले जाते. त्यामुळे पैसे दुकानदाराऐवजी फसवणूक करणाऱ्या भामट्याच्या खिशात जातात. त्यामुळे पेमेंट करण्यापूर्वी क्युआर कोडची खात्री करा. तसं जाणवलं तर दुकानदारालाही अलर्ट करा.

4 / 6
ऑनलाईन पेमेंट करताना  स्क्रीनवर कुणाचं नाव येतं ते तपासा आणि दुकानदाराचे तेच नाव आहे याचीही खात्री करून घ्या. वेगळेच नाव दिसत असल्यास दुकानदाराला विचारा म्हणजे चुकीच्या खात्यात पैसा जाणार नाही आणि दुकानदारासह तुमची फसवणूक होणार नाही.

5 / 6
पेमेंट करताना गडबड करू नका. क्युआर कोड स्कॅन झाल्यावर लागलीच पे बटण दाबू नका. सर्व बाबी तपासल्यानंतरच आणि खात्री पटल्यानंतरच पेमेंट करा. ही प्रक्रिया फार तर दोन ते तीन मिनिटं घेईल. पण पैसा चुकीच्या खात्यात जाणार नाही.

6 / 6
क्युआर कोड तिरपा अथवा अस्पष्ट असल्यास त्याविषयीची दुकानदाराकडून खात्री करून घ्या. अनेकदा क्युआर कोड अस्पष्ट दिसतो अथवा तो व्यवस्थित लावलेला नसतो. अशावेळी संपूर्ण खात्री करूनच पेमेंट करा. दुकानदाराला याविषयीची माहिती विचारा.

Follow Us