
डॉक्टर जयशंकर यांचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ते पाकिस्तानात असल्यामुळे अनेक युजरने त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. त्या ठिकाणी कोणावर विश्वास ठेऊ नका, असे म्हटले आहे.

काही जणांनी पाकिस्तानात असे फिरु नका. भारतात परतल्यावर तुम्ही मॉर्निंग वॉक करा, असा काळजीयुक्त सल्ला दिला आहे. काही जणांनी हिंदी म्हणी 'इसे बोलते है छाती पर मूँग दलना' चा वापर करत पाकिस्तानला शालजोडीतले टोमणे मारले आहे.

डॉ. जयशंकर यांनी पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयजवळ मॉर्निंग वॉक करतानाचे फोटो शेअर केले आहे. पाकिस्तानसारख्या राष्ट्रात जाऊन मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या जयशंकर यांचे फोटो पाहून लोकांनी कमेंट केल्या आहेत.

डॉ. जयशंकर इस्लामाबाद पोहचल्यावर वरिष्ठ पाकिस्तानी अधिकारी नूर खान यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. तसेच पाकिस्तानातील मुलांनी पारंपारीक वेशभूषा परिधान करुन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

पाकिस्तानात पोहचल्यावर डॉक्टर जयशंकर यांच्या वेगळ्या अंदाजाची चर्चा आहे. भारतीय हवाईदलाच्या विमानातून उतरल्यानंतर गाडीकडे जाताना त्यांनी काळा चष्मा परिधान केला आहे. सूट-बूटमध्ये काळा चष्मा लावणारा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लोक त्याला असली हीरो अन् बॉसची स्टाइल म्हणत आहेत.