
जळगावच्या सराफ बाजारामध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांची सकाळपासूनच गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे.

जळगावच्या सराफा बाजारात वर्षभरामध्ये सोन्याच्या दारात तब्बल पन्नास हजार रुपयांनी तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 70 हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी सोन्याचे दर 70 हजार रुपये होते तर चांदीचे दर 80 हजार रुपये होते. आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 21 हजार 500 रुपयांवर पोहचले असून चांदीचे दर 1 लाख 51 हजार 600 रुपयांवर पोहोचले आहेत.

रशिया युक्रेन युद्ध, डोनाल्ड ट्रम्प यांचं टेरीफ संदर्भातलं धोरण यासह वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोन्या-चांदीच्या दरावर मोठा परिणाम झाला आहे.

वर्षभरात पन्नास हजार रुपयांनी वाढ झाल्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बाब आहे.

दुसरीकडे वाढत्या सोन्या-चांदीच्या दरामुळे ग्राहकांचा बजेट देखील कोलमडल्याचा चित्र पाहायला मिळत आहे.

तर पुण्यात भाव वाढीमुळे पुण्यातील सराफ दुकानांत सोनं खरेदी करण्यासाठी नागरिकांचा अल्प प्रतिसाद दिसत आहे.

सोन्याच्या दरात गत पंधरवड्यात दहा ग्रॅम मागे दहा हजार रुपयांनी वाढ झाली असून साडेतीन मुहूर्तापैकी एक आणि सोने खरेदीचा खास मुहूर्त असलेल्या दसरा सणला 24 कॅरेट चा भाव प्रति दहा ग्रॅम एक लाख 21 हजार रुपयावरती गेला आहे. तर चांदीचा दर किलोमागे 25000 रुपयांनी वाढून एक लाख 51 हजार रुपयांवरती गेला आहे.

सोन्याचे दर वाढले असल्याने दसऱ्याच्या दिवशीही याचा थेट परिणाम सराफाच्या दुकानातील सोने खरेदी वरती दिसत आहे.