Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सराफ बाजारात सोन्याच्या दरात उसळी, आज 10 ग्रॅम…

Todays Gold Rate: ऐन दिवाळीच्या तोंडावर सोने आणि चांदीच्या दरात एकाच दिवसात दोन वेळा वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता सोने खरेदी करणाऱ्यांना दहावेळा विचार करावा लागणार आहे.

| Updated on: Nov 04, 2026 | 12:56 PM
1 / 5
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे अनेकांचा कल हा सोने खरेदीकडे असतो. मात्र, ऐन दिवाळीच्या तोंडावर जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात उसळी पाहायला मिळाली. एकाच दिवसात थेट दोन वेळा सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे अनेकांचा कल हा सोने खरेदीकडे असतो. मात्र, ऐन दिवाळीच्या तोंडावर जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात उसळी पाहायला मिळाली. एकाच दिवसात थेट दोन वेळा सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

2 / 5

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात आज वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच तासाभरात पुन्हा सोन्याचे दर वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची चिंता वाढली आहे.

3 / 5

सकाळी सोन्याच्या दरात 2 हजार 500 रुपयांची वाढ झाली होती. लगेच एका तासामध्ये पुन्हा सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे आज 4 नोव्हेंबर रोजी 10 ग्रॅम सोन्याचे भाव जीएसटीसह 1 लाख 45 हजार 436 रुपयांवर पोहोचले आहेत.

4 / 5

तर दुसरीकडे सकाळी चांदीच्या दरात 6 हजारांची वाढ झाली होती. त्यानंतर एक तासामध्ये पुन्हा चांदीच्या दरात 4 हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे आज एक किलो चांदीचे भाव जीएसटी सह 1 लाख 95 हजार 700 रुपयांवर पोहोचले आहेत.

5 / 5

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us