
जळगावच्या सराफा बाजार सोन्या चांदीच्या दराने मोठी उसळी घेतली असून दराने ऐतिहासिक उच्चांकी गाठली आहे.

गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार रूपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 4 हजार रुपयांनी वाढ झाली आहे

जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात विना जीएसटी सोन्याच्या दराने 1 लाख 3 हजारांचा तर चांदीचे दराने 1 लाख 20 हजारांचा आकडा पार केला आहे

इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 6 हजार 600 रुपयांवर पोहोचले आहेत तर चांदीचे दर 1 लाख 24 हजार रुपयांवर पोहोचले आहे

जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासातले सोन्याने चांदीचे आजचे दर हे सर्वाधिक असल्याचं सराफ व्यावसायिक यांनी म्हटलं आहे

टेरीफ रेटमुळे डॉलरच्या किमतीवर परिणाम झाला आहे, तर तर फेडरल बँकेच्या बैठकीनंतर व्याजदर कमी होण्याची शक्यता असल्याने याचा परिणाम सोन्याने चांदीच्या दरावर झाल्याचं सराफ व्यावसायिक यांचं म्हणणं आहे.

सोन्या आणि चांदीच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांवर देखील त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

सोन्या चांदीचे खरेदी आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नसून हौस कशी पूर्ण करायची असा सवाल महिला ग्राहकांनी उपस्थित केला आहे.