धक्कादायक! कपडे फाडले, काळं फासलं, जरांगेंच्या विरोधात पोस्ट टाकताच भयंकर कृत्य!

दरम्यान, आता जरांगे यांच्या या भूमिकेनंतर राज्यभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान जालना जिल्ह्यात जरांगे यांच्याविरोधात पोस्ट करणाऱ्या एका व्यक्तीला काळे फासल्याचा प्रकार घडला आहे.

| Updated on: Aug 26, 2025 | 7:28 PM
1 / 5
सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण मनोज जरांगे यांनी येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत जाऊन आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. काहीही झालं तरी मी मुंबईला जाणारच, असा पवित्रा जरांगे यांनी घेतलाय.

2 / 5
जरांगेंनी मुंबईत जाणार असल्याचं सांगितलं असलं तरी मुंबई उच्च न्यायालयाने मात्र त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास नकार दिला आहे. तसेच नवी मुंबई, ठाणे परिसरात आंदोलन करण्यासाठी परवानगी देण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

3 / 5
दरम्यान, आता जरांगे यांच्या या भूमिकेनंतर राज्यभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान जालना जिल्ह्यात जरांगे यांच्याविरोधात पोस्ट करणाऱ्या एका व्यक्तीला काळे फासल्याचा प्रकार घडला आहे.

दरम्यान, आता जरांगे यांच्या या भूमिकेनंतर राज्यभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान जालना जिल्ह्यात जरांगे यांच्याविरोधात पोस्ट करणाऱ्या एका व्यक्तीला काळे फासल्याचा प्रकार घडला आहे.

4 / 5
असे असतानाच आता मनोज जरंगे यांच्याविरोधात पोस्ट करणाऱ्या एका व्यक्तीला काळे फासण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या व्यक्तीच्या अंगावरचे कपडे फाडण्यात आले आहेत. तसेच या व्यक्तीला धक्काबुक्कीही करण्यात आली आहे.

5 / 5
या घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. विदूर लाकडे असे काळे फासण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. विदूर यांनी मनोज जरंगे यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यानंतर जरांगे यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. जालना जिल्ह्यात ही घटना घडली आहे.