Jay Pawar : अचानक लिफ्टमध्ये झाला आवाज अन्…जय पवार 18 व्या मजल्यावरून पायरीने उतरले; त्या भेटीनंतर काय घडलं?
जय पवार यांनी अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आल्यानंतर त्यावर असमाधान व्यक्त केले होते. मी या अहवालावर असमाधानी आहे, असे ते म्हणाले होते. दरम्यान आता त्यांनी पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

दिवंगत नेते अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी आज पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अजित पवार यांच्या अपघात झालेल्या विमानात पिंकी माळी या फ्लाईट अटेंडंट होत्या. अजितदादांच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर पिंकी माळी यांचादेखील त्यात मृत्यू झाला.

दरम्यान, जय पवार यांनी अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आल्यानंतर त्यावर असमाधान व्यक्त केले होते. मी या अहवालावर असमाधानी आहे, असे ते म्हणाले होते. दरम्यान आता त्यांनी पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

या भेटीमध्ये त्यांनी पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच आता आम्ही एका कुटुंबाप्रमाणे एकमेकांची काळजी घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. पिंकी माळी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन लिफ्टमधून परतताना मात्र त्यांच्यासोबत वेगळी घटना घडली.

ते लिफ्टमधून खाली येत होते. परंतु अचानकपणे लिफ्टमध्ये वेगळा आवाज झाला. त्यामुळे त्यांनी लिफ्टमधून लगेच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच ते संपूर्ण इमारतीवरून पायऱ्यांनी खाली आले. इमारतीचे संपूर्ण 18 मजले ते पायऱ्यांवरून खाली आले.

पिंकी माळीच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर जय पवार 18 मजल्यांच्या पायऱ्या उतरून खाली आले. लिफ्टमध्ये आवाज आल्याने सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी लिफ्टचा वापर टाळला आणि ते पायऱ्यांनी खाली उतरले.