
2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला पाचवे पदक मिळाले आहे. 19 वर्षीय जेरेमी लालरिनुंगाने वेटलिफ्टिंगमध्ये आपले पाचवे पदक जिंकले आहे. जेरेमीने 67 किलो वजनी गटात 300 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले.

जेरेमीने वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली बॉक्सर म्हणून प्रशिक्षण सुरू केले. त्याचे वडील राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सर होते. पुढे त्याने वेटलिफ्टिंगचा सराव सुरू केला. वयाच्या 10 व्या वर्षी त्याने वजन उचलण्यास सुरुवात केली.

यानंतर जेरेमीने विजय शर्मा यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आणि नंतर पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण सुरू केले. 2016 मध्ये त्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली.

जेरेमी लालरिनुंगाने पुरुषांच्या 67 किलो गटात 305 किलो वजन उचलले आणि राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

2018 च्या युवा ऑलिम्पिकमध्ये त्याने पुरुषांच्या 62 किलो वजनी गटात 274 किलो (124 किलो + 150 किलो) वजन उचलले आणि सुवर्णपदक जिंकले. त्यावेळी ते फक्त 15 वर्षांचे होते. त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ३०६ किलो (140 किलो + 166 किलो) आहे.