Jio : जिओचा 189 रुपयांचा प्लॅन, इंटरनेट, कॉलिंग, SMS सगळंच मिळणार

रिलायन्स जिओ ही देशातील नंबर एक टेलिकॉम कंपनी आहे. जिओकडे VI, एअरटेल आणि सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL पेक्षा खूप जास्त ग्राहक आहेत. जिओने आपल्या 51 कोटींहून अधिक ग्राहकांसाठी 189 रुपयांचा प्लॅन आणला आहे.

बापू गायकवाड | Updated on: Mar 24, 2026 | 9:27 PM
1 / 5
आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी जिओ विविध स्वस्त आणि परवडणारे रिचार्ज प्लॅन्स ऑफर करते. कंपनीकडे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म असे दोन्ही प्रकारचे अनेक प्लॅन्स उपलब्ध आहेत.

आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी जिओ विविध स्वस्त आणि परवडणारे रिचार्ज प्लॅन्स ऑफर करते. कंपनीकडे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म असे दोन्ही प्रकारचे अनेक प्लॅन्स उपलब्ध आहेत.

2 / 5

मोबाइल रिचार्ज प्लॅन संपल्यानंतर इनकमिंग सेवा बंद होते, अशा वेळी अनेकांना इनकमिंग सेवा देणारे स्वस्त प्लॅन्स कोणते हे समजत नाही. आज आपण एका स्वस्त प्लॅनची माहिती जाणून घेऊयात.

3 / 5

जिओचा इनकमिंग सेवा देणारा सर्वात स्वस्त प्लॅन 189 रुपयांचा आहे. छोटा आणि परवडणारा रिचार्ज हवा असल्यास हा प्लॅन उपयुक्त ठरू शकतो. या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता मिळते.

4 / 5

जिओच्या 189 रुपयांच्या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्याद कॉलिंगची सुविधा दिली जाते. याशिवाय, या प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना एकूण 2GB डेटा आणि 300 मोफत एसएमएस मिळतात.

5 / 5

जिओकडे 195 रुपयांचा एक प्लॅन देखील आहे, ज्यामध्ये 90 दिवसांची वैधता आणि 15GB डेटा मिळतो. मात्र, या प्लॅनमध्ये कॉलिंगची सुविधा दिली जात नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us