
प्लॅनची किंमत आणि वैधता: जिओचा हा रिचार्ज प्लॅन 3599 रुपयांचा असून यामध्ये ग्राहकांना पूर्ण 365 दिवसांची म्हणजेच एका वर्षाची वैधता मिळते.

अनलिमिटेड कॉलिंग: या प्लॅनमध्ये युजर्सना कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी पूर्ण वर्षासाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे.

डेटा बेनिफिट्स: ग्राहकांना दररोज 2.5 GB हाय-स्पीड डेटा मिळतो. पूर्ण वर्षाचा विचार केला तर एकूण 912 GB पेक्षा जास्त डेटा या प्लॅनमध्ये समाविष्ट आहे.

5G ऑफर: जे ग्राहक जिओच्या 'एलिजिबल 5G' कव्हरेजमध्ये आहेत, त्यांना या प्लॅनसोबत अनलिमिटेड 5G डेटा मोफत वापरता येईल. तसेच ग्राहकांना दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळतात.

अतिरिक्त सबस्क्रिप्शन: या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमा यांसारख्या जिओ ॲप्सचे मोफत ॲक्सेस मिळते. त्यामुळे हा प्लॅन अनेकांसाठी फायदेशीर ठरू शकतो.