Jio Home Offer : जिओ होमचा मोठा धमाका, 5 महिने फ्री इंटरनेट, दिवाळीच्या खास ऑफरची एकच चर्चा!
जिओने दिवाळीनिमित्त ही ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्हाला पाच महिन्यापर्यंत मोफत हायस्पीड इंटरनेट मिळू शकते. टीव्ही शो, चित्रपटांचाही तुम्हाला मनमुराद आनंद घेता येणार आहे.

JioHome Diwali Offer: जिओ होमने आता दमदार ऑफर आणली आहे. दिवाळीनिमित्त आणलेल्या या ऑफरमध्ये तब्बल 5 महिने मोफत इंटरनेट मिळणार आहे. ही ऑफिर काय आहे ते जाणून घेऊ या..
जिओने दिवाळीनिमित्त ही ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्हाला पाच महिन्यापर्यंत मोफत हायस्पीड इंटरनेट मिळू शकते. टीव्ही शो, चित्रपटांचाही तुम्हाला मनमुराद आनंद घेता येणार आहे.
या नव्या ऑफर अंतर्गत युजरला पाच महिन्यांसाठी JioHome च्या सर्व्हिसेस पाच महिन्यांसाठी मोफत मिळणार आहेत. तुम्ही एकदाच दहा महिन्यांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला जिओ होमतर्फे अतिरिक्त 5 महिन्यांच्या सेवा मोफत दिल्या जाणार आहेत.
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त 8219582195 या नंबरवर मिस कॉल द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशन मेसेज मिळेल. हे कन्फर्मेशन मिळाल्यानंतर तुम्हाला या ऑफरचा लाभ मिळेल.
सणासुदीच्या काळात ग्राहकांना अडथळा निर्माण होऊ नये. तसेच ग्राहकांचाही फायदा व्हावा यासाठी जिओ होमने ही सुविधा आणली आहे.