Jio IPO च्या दमदार लिस्टिंगनंतर अंबानी कुटुंब सिद्धिविनायकाच्या चरणी, पाहा खास फोटो
शेअर बाजारात जिओचे लिस्टिंग झालं आहे. कंपनीचा शेअर 1350 रुपयांहून अधिक किमतीवर व्यवहार करत आहे. या खास प्रसंगी अंबानी कुटुंबाने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन श्रीगणेशाचे दर्शन घेतले.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी आज मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपति मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
यावेळी मंदिर ट्रस्टचे चेअरमन सदानंद सरवणकर यांनी मुकेश अंबानी यांचं स्वागत केलं आणि त्यांना गणरायाची प्रतिमा भेट दिली. या प्रसंगी ट्रस्टशी निगडीत महेश मुदलियार आणइ मंदिराच्या एक्झिक्युटिव्ह ऑफीसर राखी चव्हाण याही उपस्थित होत्या.
जिओ प्लॅटफॉर्म्सच्या शेअर बाजारातील ऐतिहासिक लिस्टिंगच्या दिवशी अंबानी कुटुंबाने सिद्धिविनायकाच्या दरबारात हजेरी लावून गणरायाचे आशीर्वाद घेतले.
जिओ प्लॅटफॉर्म्सने बुधवारी शेअर बाजारात दमदार सुरुवात केली. कंपनीचे शेअर्स 1,119 या आयपीओच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत 1,358 रुपयावर सूचीबद्ध झाले. म्हणजेच, शेअर्सची लिस्टिंग सुमारे 21.3 टक्के प्रीमियमवर झाली. या लिस्टिंगला भारतीय शेअर बाजारातील एक महत्त्वपूर्ण उपलब्धी मानली जात आहे.
जिओच्या या ऐतिहासिक लिस्टिंगमुळे रिलायन्स समूहाने डिजिटल आणि दूरसंचार क्षेत्रातील आपले स्थान अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकलं आहे.