Jio चा बाजारात धुमाकूळ घालणारा प्लॅन, 666 रुपयांमध्ये मिळणार इतके फायदे
Jio 666 Recharge Plan : देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओकडे ग्राहकांसाठी अनेक आकर्षक रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये एक असा किफायतशीर प्लॅनही आहे, जो वापरकर्त्यांना तब्बल 70 दिवसांची वैधता देतो. त्याची माहिती जाणून घेऊयात.

सध्या देशभरात जवळपास 52 कोटी ग्राहक जिओच्या सेवा वापरत आहेत. ग्राहकांच्या विविध गरजा लक्षात घेऊन कंपनीने शॉर्ट टर्म आणि लॉन्ग टर्म अशा दोन्ही प्रकारचे प्लॅन्स उपलब्ध करून दिले आहेत. विशेष म्हणजे महागड्या प्लॅन्ससोबतच बजेट फ्रेंडली पर्यायही जिओकडे आहेत.

तुम्ही तुमचा जिओ नंबर रिचार्ज करण्याचा विचार करत असाल, तर 666 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. हा एक प्रीपेड प्लॅन असून यामध्ये 70 दिवसांची वैधता मिळते. त्यामुळे दोन महिन्यांहून अधिक काळ रिचार्जची चिंता राहत नाही.

या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 105GB हाय-स्पीड डेटा मिळतो. म्हणजेच दररोज 1.5GB डेटा वापरण्याची सुविधा दिली जाते. प्लॅनमध्ये अमर्याद व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच चॅटिंग आणि मेसेजिंगसाठी दररोज 100 मोफत SMS देखील दिले जातात.

जिओच्या या प्लॅनसोबत काही खास अतिरिक्त फायदेही मिळतात. ग्राहकांना 18 महिन्यांसाठी Google Gemini चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. याशिवाय JioTV आणि JioHotstar यांचेही मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध करून दिले जाते.

कमी किंमतीत दीर्घ वैधता, भरपूर डेटा आणि OTT तसेच AI सेवांचा लाभ मिळत असल्याने 666 रुपयांचा हा प्लॅन जिओ ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो.