PHOTO | नड्डांच्या ताफ्यावर दगडफेक, भाजप टीएमसीचं गुंडाराज संपवून सत्तेत येणार: नड्डा

| Updated on: Dec 10, 2020 | 4:51 PM

बंगालमध्ये प्रशासन नावाची गोष्ट अस्तित्वात नसल्याचा आरोप जे.पी.नड्डांनी केला. (J P Nadda criticize tmc)

1 / 5
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा हे सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. जेपी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यातील वाहनांवर तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

2 / 5
कैलाश विजयवर्गीय आणि राहुल सिन्हा यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर भाजप आक्रमक झाली. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात अराजकता आणि असहिष्णुता वाढल्याचा आरोप केला.

3 / 5
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या गुंडानी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला. ही अराजकता फार काळ चालणार नाही. ममता बॅनर्जींचे सरकार जाऊन भाजपचं कमळ बंगालमध्ये फुलणार असल्याचं जे.पी. नड्डा म्हणाले.

4 / 5
 कैलाश विजयवर्गीय, राहुल सिन्हा यांच्या वाहनांवर हल्ला झाला, त्यांच्या वाहनांची परिस्थिती पाहा. माझी गाडी बुलेट प्रुफ असल्यामुळे वाचलो, असं जे.पी. नड्डा म्हणाले. बंगालमध्ये प्रशासन नावाची गोष्ट अस्तित्वात नसल्याचा आरोप जे.पी.नड्डांनी केला. सीआरपीएफ नसेल तर बंगालमध्ये फिरणं अशक्य आहे. कार्यकर्त्यांची काय अवस्था असेल, असं जे.पी. नड्डा म्हणाले.

5 / 5
बंगालमधील गुंडाराज संपवून लोकशाही मजबूत करायची आहे. विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा यांचा विचार आहे. बंगालला सभ्यता, संस्कृतीसाठी ओळखले जाते. ममता बॅनर्जींनी ज्या प्रकारे सरकार चालवलं आहे. त्याद्वारे त्यांनी बंगालला खाली खेचण्याचं काम केलं आहे, असा आरोप जे.पी.नड्डा यांनी केला.