Photo : ‘सिंघम फेम’ काजल अग्रवालचा ग्लॅमरस अंदाज

अभिनेत्री काजल अग्रवालने 2004 मध्ये विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.(Kajal Agrawal's glamorous look)

VN | Updated on: Mar 17, 2021 | 11:41 AM
1 / 5
अभिनेत्री काजल अग्रवालने 2004 मध्ये विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबत बॉलिवूडची सुरुवात केली.

अभिनेत्री काजल अग्रवालने 2004 मध्ये विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबत बॉलिवूडची सुरुवात केली.

2 / 5

अभिनेता अजय देवगणच्या सिंघम सिनेमातील अभिनेत्री काजल अग्रवालचे चाहते टॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत आहेत. काजलच्या सौंदर्याची स्तुती सर्वच जण करतात.

3 / 5

सध्या काजल अग्रवाल दाक्षिणात्य सिनेमातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. टॉलिवूडमध्ये तिने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. शिवाय बॉलिवूडमध्येही तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.

4 / 5

काजलच्या करिअरच्या सुरुवातीमध्ये ‘मगधीरा’ सिनेमाचा मोठा वाटा आहे. या सिनेमाने तिच्या करिअरमध्ये सर्वाधिक कमाई केली. बॉलिवूडमध्ये तिने सिंगम, स्पेशल 26, दो लफ्जो की कहानी यासारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

5 / 5

नुकतंच काजल उद्योगपती गौतम किचलू यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली आहे. आता नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांशी कनेक्ट होतेय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us