
कंगना राणावत ही कायमच चर्चेत असणारी बाॅलिवूड अभिनेत्री आहे. कंगना राणावत ही तिच्या तेजस या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. अभिनेत्री या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतंय.

कंगना राणावत ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. इतकेच नाही तर कंगना राणावत हिचे मुंबईतील बांद्रा परिसरात आलिशान असे घर असून या घराची किंमत आज कोटयवधीमध्ये आहे.

कंगना राणावत हिचे बांद्रामधील हे घर अत्यंत खास डिझाईन करण्यात आलंय. हे घर अत्यंत मोठे असून अत्यंत महागड्या पेंटिंग्स या घरात बघायला मिळतात.

कंगना राणावत हिच्या या घरात देवघर देखील आहे. अनेकदा कंगना राणावत ही या घरातील काही फोटो हे सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

इतकेच नाही तर हाॅलमध्ये मोठा पांढऱ्या रंगाचा सोपा देखील या घरात बघायला मिळतो. कंगना राणावत हिने एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय.