
दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) आणि बॉलिवूड अभिनेता दिलजित दोसांझ (Diljit Dosanjh) यांच्यातलं ट्विटर वॉर शिगेला पोहोचलं होतं. दोन्ही बाजूंनी टीकेची झोड उठली होती. गेल्या काहीच दिवसांपूर्वी हे ट्विटर वॉर संपुष्टात आलेलं असताना आता पुन्हा एकदा कंगनाने दिलजीतला डिवचलं आहे.

दिलजित दोसांझने त्याच्या ट्विटरवर काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये तो सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बर्फाळ प्रदेशात गेलेला दिसून येत आहे. दिलजीतचे याच फोटोंवरुन कंगनाने त्याच्यावर निशाणा साधला आहे.

व्वा भावा देशामध्ये आग लावलीस आणि आता सुट्ट्यांचा आनंद घेतोस... याला म्हणतात लोकल क्रांतिकारी, अशा शब्दात कंगनाने दिलजीतवर प्रहार केला आहे.

दिलजीतच्या फोटोवर कमेंट करताना कंगनाने म्हटलंय, "देशामध्ये आग लावून, शेतकऱ्यांना रस्त्यावर बसवून क्रांतिकारी विदेशात थंडीची मजा घेण्यासाठी गेलाय, व्वा... "

