Kathavachak Jaya Kishori : साधं, सोज्वळ सौंदर्य, मंदिरात पिवळ्या साडीवर आलेल्या जया किशोरी यांचा लूक ठरला चर्चेचा विषय

Kathavachak Jaya Kishori : नवरात्री सुरु आहे. कथावाचक आणि भजन गायिका जया किशोरी यांनी हिमाचल प्रदेशच्या कांगडामध्ये माता श्री बगलामुखीच दर्शन करुन आशीर्वाद घेतले. मंदिर परिसरातील त्यांचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्यात त्या हात जोडताना दिसतायत.

| Updated on: Oct 14, 2026 | 1:52 PM
1 / 5
मूळच्या कथावाचक मोटिवेशनल स्पीकर असलेल्या जया किशोरी नवरात्रीमध्ये हिमाचल प्रदेशच्या प्रसिद्ध मंदिरात दर्शन घेताना दिसतायत. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जया किशोरी उपस्थितांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी ओळखल्या जातात.

मूळच्या कथावाचक मोटिवेशनल स्पीकर असलेल्या जया किशोरी नवरात्रीमध्ये हिमाचल प्रदेशच्या प्रसिद्ध मंदिरात दर्शन घेताना दिसतायत. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जया किशोरी उपस्थितांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी ओळखल्या जातात.

2 / 5

जया किशोरी यांचं साधं राहणीमान हे सुद्धा त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. बऱ्याचदा त्या अनारकली सूटमध्ये दिसतात. पण यावेळी त्या मां बगलामुखी मंदिरात साडी नेसून आलेल्या. त्याशिवाय त्यांचे सूटमधील फोटो सुद्धा समोर आलेत. सिंपल लूकमध्ये त्या खूप सुंदर दिसतायत.

3 / 5

कांगडाच्या प्रसिद्ध श्री बगलामुखी मंदिरात त्या पिवळी साडी नेसून दर्शनासाठी पोहोचल्या. जया किशोरी नेहमी सूटमध्ये दिसतात. जया किशोरी साडीमध्ये सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत. हळदी रंगाची त्यांनी साडी नेसली आहे. त्यावर मीडियम साइजची पर्पल कलरची बॉर्डर आहे.

4 / 5

नेहमीप्रमाण जया किशोरी यांच्या डोक्यावर काळ्या रंगाची टिकली आहे. कानात छोटे इयररिंग्स आहेत. त्याशिवाय एका हातात लाल रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत. त्यांनी स्वत: इन्स्टाग्राम स्टोरीवर हा फोटो शेअर केलाय. त्याशिवाय मंदिराचे फोटो सुद्धा इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेत.

5 / 5

श्री बगलामुखी मंदिरात जाण्याआधी जया किशोरी यांनी विश्व प्रसिद्ध शक्तिपीठ श्री ज्वालामुखी मंदिर आणि कांगडाच्या दुसऱ्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले. श्री ज्वालामुखी मंदिरात त्यांनी विधिवत पूजा-अर्चना केली. मातेच्या पवित्र ज्योतीचं दर्शन केलं. ज्वालामुखी मंदिरात त्या रानी पिंक कलरचा सूट घालून गेलेल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us