AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संधी चालून आली होती तरीही गंभीरने नाकारली, गावस्कर म्हणाले, जर असं केलं असतं तर किवींच्या नाकी नऊ आले असते

टीम इंडियाच्या एका निर्णयावर सुनील गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, या खेळाडूला संधी दिली असती तर न्यूझीलंडच्या बॅटर्सना अनपेक्षित धक्का बसला असता. गावस्करांनी नेमकं काय सांगितलं?

संधी चालून आली होती तरीही गंभीरने नाकारली, गावस्कर म्हणाले, जर असं केलं असतं तर किवींच्या नाकी नऊ आले असते
Mohammed Siraj Selection Controversy Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 29, 2026 | 5:13 PM
Share

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोहम्मद सिराजला संधी द्यायला हवी होती, असं मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलं आहे. आकाश दीपच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला कन्कशन सब्स्टिट्यूट म्हणून मैदानात उतरवण्याच्या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रसिद्ध कृष्णाऐवजी सिराज खेळला असता तर न्यूझीलंडच्या बॅटर्ससाठी ते अनपेक्षित आव्हान ठरलं असतं, असं गावस्कर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर आता चर्चा सुरू झाली आहे.

प्रसिद्ध कृष्णाऐवजी सिराज का हवा होता?

गावस्कर यांच्या मते, न्यूझीलंडच्या बॅटर्सनी पहिल्या टेस्टमध्ये प्रसिद्ध कृष्णाच्या बॉलिंगचा सामना केला होता. त्यामुळे त्याची बॉलिंग करण्याची पद्धत, दिशा आणि लांबी यांचा त्यांना अंदाज आला होता. अशा परिस्थितीत दुसऱ्या टेस्टमध्ये पुन्हा प्रसिद्ध कृष्णाला संधी दिल्याने न्यूझीलंडच्या फलंदाजांसमोर नवीन आव्हान निर्माण झालं नसतं.

याउलट मोहम्मद सिराज पहिली टेस्ट खेळला नव्हता. त्यामुळे तो पूर्णपणे फ्रेश होता. त्याच्या वेगवान बॉलिंगचा सामना करण्यासाठी न्यूझीलंडच्या बॅटर्सना नव्याने तयारी करावी लागली असती. सिराजचा संघात समावेश केला असता तर भारतीय गोलंदाजीला वेगळी धार मिळाली असती, असं गावस्कर यांना वाटतं.

गावस्कर नेमकं काय म्हणाले?

सुनील गावस्कर यांनी या निर्णयाबाबत आपलं मत मांडताना सांगितलं की, एका फलंदाजी युनिटच्या दृष्टीने विचार केला तर तुम्ही ज्या गोलंदाजांचा सामना करणार आहात, त्यांच्यासाठी आधीच तयारी करता. न्यूझीलंडच्या बॅटर्सनी सिराजचा फारसा विचार केला नसता. त्यामुळे सिराज मैदानात उतरला असता तर त्यांच्यासाठी तो धक्का ठरला असता.

प्रसिद्ध कृष्णाची पहिल्या टेस्टमधील कामगिरी

प्रसिद्ध कृष्णाने पहिल्या टेस्टमध्ये दोन्ही इनिंग मिळून 123 रन दिले आणि 3 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर त्याला दुसऱ्या टेस्टच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं नव्हतं. मात्र, आकाश दीपला दुखापत झाल्यानंतर प्रसिद्ध कृष्णाला कन्कशन सब्स्टिट्यूट म्हणून मैदानात उतरवण्यात आलं. याच निर्णयावर गावस्कर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Follow Us
मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटल यांना...
Raksha Khadse : मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटलांना दिलं प्रत्युत्तर!
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; मोदी
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; म्हणाले, मोदींचे निर्णय ऐतिहासिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी दिले स्पष्ट निर्देश!
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बन...
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बनांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक...
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा!
शरद पवारांच्या NCP ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे...
शरद पवारांच्या NCP  ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे; काँग्रेस नेत्याचे पुन्हा आवाहन!