
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी नुकतंच लग्न केल्याने दोघांची चर्चा सोशल मीडियावर अधिक असते. कारण दोघंही त्याचे अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असतात.

लग्न केल्यापासून दोघांनाही चांगलीचं प्रसिध्दी मिळाल्याचे आपण पाहतोय, कारण दोघांचे सोशल मीडियावर चाहते अधिक वाढले आहेत.

दोघांनीही करिअरमध्ये यश मिळवलं असल्याने त्यांचा चाहता वर्ग सुध्दा त्यांना कमेंटच्या माध्यमातून शुभेच्छा देत असतो.

डिसेंबर महिन्यात या दोघांचं लग्न झालं, लग्नाला अनेक मान्यवर मंडळी देखील उपस्थित होती. तसेच कतरिना कैफचे कुटुंबीय देखील लग्नासाठी परदेशातून आले होते.

नुकतंच लग्न झालेलं जोडप एअरपोर्टवर दिसल्याने अनेकांना प्रश्न पडला आहे की, हे जोडपं नेमकं कुठं निघालं आहे कारण उद्या 'व्हॅलेन्टाईन्स डे' त्यामुळे साजरा करण्यासाठी कुठं निघालं आहे.

ते एअरपोर्टवर दिसल्यानंतर अनेकांनी त्याचे फोटो काढले आहे, तसेच त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दोघांनीही मास्क घातलेला आहे, जीन्स आणि शर्ट घातलेला असून हातात हात घालून नेमके गेले कुठे असा प्रश्न अनेकांना पडलाय.

'व्हॅलेन्टाईन्स डे' त्यांनी साजरा केल्यानंतर त्यांनी समजा सोशल मीडियावर फोटो शेअर केले तर आपण अंदाज लावू शकतो.