जिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता 90 दिवसांपर्यंत…

Jio Recharge Plan : रियायन्स जिओ ही 51 कोटींहून अधिक वापरकर्त्यांसह देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओने आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एका खास रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. याची माहिती जाणून घेऊयात.

बापू गायकवाड | Updated on: Mar 11, 2026 | 9:56 PM
1 / 5
मोबाइल वापरकर्त्यांना वारंवार महाग रिचार्ज करावा लागू नये म्हणून कंपनीने लाँग व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅन्सची संख्या वाढवली आहे. आता वापरकर्ते एकच प्लॅन घेऊन आपला मोबाइल नंबर अनेक महिन्यांपर्यंत सक्रिय ठेवू शकतात.

मोबाइल वापरकर्त्यांना वारंवार महाग रिचार्ज करावा लागू नये म्हणून कंपनीने लाँग व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅन्सची संख्या वाढवली आहे. आता वापरकर्ते एकच प्लॅन घेऊन आपला मोबाइल नंबर अनेक महिन्यांपर्यंत सक्रिय ठेवू शकतात.

2 / 5

जर तुम्ही जियोचा लाँग व्हॅलिडिटीचा स्वस्त प्लॅन शोधत असाल, तर ₹899 चा प्लॅन घेऊ शकता. या प्लॅनमुळे तुम्ही तुमचे सिम कार्ड 3 महिने कॉलिंग सेवेसह सक्रिय ठेवू शकता.

3 / 5

या प्लॅनमध्ये मोबाइल वापरकर्त्यांना 90 दिवसांची वैधता मिळते. यासोबतच 90 दिवसांपर्यंत सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येते. तसेच दररोज 100 मोफत एसएमएस देखील दिले जातात.

4 / 5

हा प्लॅन जास्त डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठीही किफायतशीर आहे. या प्लॅनमध्ये कंपनी दररोज 2GB डेटा देते. म्हणजे 90 दिवसांत तुम्हाला एकूण 180GB डेटा मिळतो. यात अतिरिक्त 20GB डेटा देखील मिळतो.

5 / 5

याशिवाय जियो आपल्या ग्राहकांना काही अतिरिक्त फायदेही देत आहे. या प्लॅनसोबत 3 महिन्यांचे JioHotstar OTT सब्सक्रिप्शन मिळते. तसेच टीव्ही चॅनेल्स पाहण्यासाठी JioTV चे सब्सक्रिप्शनही दिले जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us